Corona
Corona
सार्वमत

नेवासा : सलाबतपूर परिसरात एकाच दिवशी 16 संक्रमित

सलाबतपुरात 14 तर गिडेगाव व जळकेत प्रत्येकी एकजण संक्रमित

Arvind Arkhade

सलाबतपूर|वार्ताहर|Salabatpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे आणखी चौदा, गिडेगाव येथे एक तर जळके येथे एक करोना संक्रमित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

रविवारी सायंकाळी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर रात्री उशिरा चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सलाबतपूरमधील करोनाबाधिताचा आकडा सातवर गेला होता. सोमवारी नेवासा तहसीलदार रुपेश सुराणा तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने करोना बाधित व्यक्तिच्या संपर्कातील व्यक्तिंच्या रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्या.

त्यात 14 जण करोना संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आता करोना बाधितांची एकूण संख्या तब्बल 21 वर पोहचली आहे. सोमवारी आढळलेल्या करोना बाधितांना नेवासा कोव्हिड केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com