'चांदा' बंदला शंभर टक्के प्रतिसाद

'चांदा' बंदला शंभर टक्के प्रतिसाद

चांदा | वार्ताहर

नेवासा (Newasa) तालुक्यातील चांदा (Chanda) येथे नामदार शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) आणि यांचे सुपुत्र उदयन गडाख (Udayan Gadakh) यांच्या विषयी सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या धमकीच्या ऑडिओ क्लिपच्या निषेधार्थ चांदा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

'चांदा' बंदला शंभर टक्के प्रतिसाद
पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा 'आर्ची'चे खास फोटो

नामदार शंकरराव गडाख यांचे समर्थक कार्यकर्ते व व्यापारी असोसीएशन यांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार सकाळी सर्व पदाधिकारी, व्यापारी व गावातील ग्रामस्थांनी या बंदमध्ये सहभाग घेऊन कडकडीत बंद पाळला. सकाळी नऊ वाजता चांदा बाजार तळावर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे, जिल्हा परिषद सदस्य अनिलराव अडसुरे, मुळाचे संचालक बाबुराव चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन भगत, गावचे उपसरपंच चांगदेव दहातोंडे, दिलीप बोरुडे, बाळासाहेब दहातोंडे, डॉक्टर विकास दहातोंडे, संतोष गाढवे, एन टी शिंदे, बाळासाहेब जावळे, राष्ट्रवादी सेलचे अध्यक्ष भाऊसाहेब जावळे, डॉक्टर विनोद गुंदेचा, प्रकाश कटारिया, माजी सरपंच एकनाथ जावळे, प्रकाश भालके, दिपक जावळे संतोष गाढवे, चंदू जावळे, रवी जावळे, अशोक दहातोंडे, बाबासाहेब आल्हाट, सुभान शेख यांच्यासह गावातील बहुसंख्य ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी आपल्या भाषणात सदर ऑडिओ क्लिप चा जाहीर निषेध करत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा निषेध केला.

'चांदा' बंदला शंभर टक्के प्रतिसाद
'शहनाज गिल'चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

Related Stories

No stories found.