शिंगणापूरमार्गे नेवासा-राहुरी एसटी बस झाली पुर्ववत सुरु

शिंगणापूरमार्गे नेवासा-राहुरी एसटी बस झाली पुर्ववत सुरु
File Photo

शनीशिंगणापूर |वार्ताहर| Shanishinganapur

लॉकडाऊनमुळे (Lockdown) दीड वर्षाहून अधिक काळापासून बंद असलेली शनीशिंगणापूर (Shanishinganapur) मार्गे नेवासा (Newasa), राहुरी (Rahuri) एसटी बस पुर्ववत सुरु झाली असून त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे.

नेवासा आगारातून (Newasa ST Depo) बस सुटून शनिशिंगणापूर (Shanishinganapur) येथून पहाटे सहा वाजता निघून सोनईतून 6.15 वाजता राहुरीला (Rahuri) जाते. परत राहुरीहून 7.15 वाजता निघून उंबरे (Umbare), ब्राह्मणी (Bhramhani), वंजारवाडी (Wanjarwadi), सोनई (Sonai), शनिशिंगणापूर (Shanishinganapur), घोडेगाव (Ghodegav) मार्गे नेवासा बसस्थानकावर (Newasa Bus Stand) 9 च्या दरम्यान पोहचते, या मार्गावर बस चालू झाल्याने प्रवासी वर्गाची काही प्रमाणात अडचण दूर होणार आहे.

शनिदर्शनासाठी ही बस उपयुक्त ठरणार आहे. याच मार्गावर राहुरी- सोनई- शनिशिंगणापूर-शेवगाव (Shevgav), पैठण (Paithan) ही बस सुध्दा चालू आहे त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Related Stories

No stories found.