नेवासा व प्रवरासंगम येथे जुगार खेळणार्‍या दोघांवर कारवाई

नेवासा व प्रवरासंगम येथे जुगार खेळणार्‍या दोघांवर कारवाई
क्राइम

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा पोलिसांनी नेवासा खुर्द व प्रवरासंगम येथील जुगार अड्ड्यांवर छापे टाकून दोघांवर कारवाई केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अंबादास गिते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मोहन बन्सी गलाट रा. नेवासा खुर्द हा नेवासा खुर्द गावात टपरीच्या आडोशाला चेनई डे-नाईट हा हारजितीचा जुगार खेळताना व खेळविताना मिळून आला. त्याच्याकडून 360 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्याच्यावर गुन्हा रजिस्टर फर्स्ट 854/2021 मुंबई जुगार कायदा कलम 12(अ) नुसार कारवाई करण्यात आली. पुढील तपास हवालदार तुळशीराम गीते करत आहेत.

दुसरा छापा प्रवरासंगम येथे टाकण्यात आला. या छाप्याबद्दल कॉन्स्टेबल केवलसिंग हरिसिंग राजपूत यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, प्रवरासंगम गावातील बसस्टॅण्डच्या आडोशाला आरोपी विजय गंगाधर वाढे रा. प्रवरासंगम चेन्नई ड-नाईट हा हारजितीचा जुगार खेळताना मिळून आला.त्याच्यावकडून 350 रुपये रक्कम जप्त करण्यात आली. त्याच्यावर गुन्हा रजिस्टर नं 855/2021 मुंबई जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली. पुढील तपास सहायक फाजैदार श्री. ठोंबरे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com