
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
प्रवरा नदी पात्रात नेवासा शहरातील गणपती घाट येथे महिलेचा मृतदेह पाण्यात आढळून आला आहे. मंगळवारी सकाळी आशाबाई शिवाजी पाटील (वय 70) या महिलेचा मृतदेह तरंगताना स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना सदर घटनेची तत्काळ माहिती दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश कचे व पोलीस कॉन्स्टेबल वैद्य यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेवासा फाटा येथे पाठविण्यात आला आहे.