नेवाशात प्रवरा पात्रातून वाळू उपसा; चौघांवर गुन्हा दाखल

File Photo
File Photo

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा (Newasa) येथील प्रवरा नदीपात्रातून (Pravara River) विनापरवाना बेकायदा वाळू (Illegal Sand) काढून तिचा साठा करत असताना नेवासा पोलिसांनी (Newasa Police) तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 15 हजार रुपये किमतीचे 4 ब्रास वाळूचे दोन ढिगारे व वाळू भरण्यासाठीचे साहित्य असा मुद्देमाल जप्त (Seized) केला असून त्यांच्यासह ज्याच्या सांगण्यावरुन वाळू काढली जात होती तो इसम अशा चौघांवर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

File Photo
महसूल पथकावर जीवघेणा हल्ला

याबाबत पोलीस नाईक राहुल बबन यादव यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 3 एप्रिल रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नेवासा खुर्द शिवारात प्रवरा नदीपात्रात (Pravara River) गरीबन प्रसाद भगवान बिंद (वय 50) रा. रसुलपूर गाजीपूर (उत्तरप्रदेश), संजयकुमार महेंद्र बिंद (वय 35) रा. करीमुद्दीनपूर (उत्तरप्रदेश), विरेंद्र रामजतन बिंद (वय 42) रा. गाजीपूर (उत्तरप्रदेश) हे विनापरवाना बेकायदा वाळू काढून (Illegal Sand) ढिगारा बनवून साठा करताना मिळून आले.

File Photo
बाजार समिती निवडणूक : जिल्ह्यात विक्रमी अर्ज दाखल

त्यांनी 15 हजार रुपये किंमतीचे 4 ब्रास वाळूचे दोन ढिगारे केले होते. त्यांच्याकडून 700 रुपये किमतीचे तीन प्लॅस्टीकचे घमेले व दोन वाळू भरण्यासाठीचे खोेरे असा 15 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला. तुम्ही कोणाच्या सांगण्यावरुन वाळू काढीत आहात? असे विचारले असता तेव्हा त्यांनी गोरख ऊर्फ भावड्या जगन्नाथ जाधव रा. नेवासा खुर्द याचे नाव सांगितले.

File Photo
विहीर खचल्याने दबलेल्या तीन जणांचा मृत्यू; दोन जण जखमी

बेकायदेशीररित्या प्रवरा नदीपात्रातून वरील वर्णनाची व किमतीची वाळू चोरुन नेणेकरीता काढून साठा केला म्हणून माझी वरील सर्वांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नं. 380/2023 भारतीय दंड विधान कलम 379, 34 सह गौण खनिज कायदा कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

File Photo
घोडेगाव परिसराला मिळणार गोड पाणी; अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com