स्वप्न आंतरराष्ट्रीय चित्रकार होण्याचे...

स्वप्न आंतरराष्ट्रीय चित्रकार होण्याचे...

नेवासा तालुक्यातील झपाटलेला कलावंत

नेवासा/सुखदेव फुलारी | Newasa/Sukhdev Fulari

नेवासा (Newasa) तालुक्यातील वडाळा बहिरोबा (Vadala bahiroba) या गावामध्ये राहून प्रदीप वसंत पवार (Pradip Vasant Pawar) या जे.जे.स्कुल ऑफ आर्ट (J.J. School of Art) या महाविद्यालयात फाईन आर्ट (Fine art) पदवीचे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या तरुणाने विद्यार्थी दशेतच व्यावसायिक आणि संकल्पना कलाकार म्हणून काम करण्यासह आंतरराष्ट्रीय चित्रकार (International painter) होण्याचे स्वप्न बाळगले आहे.

नेवासा तालुक्यातील वडाळाबहिरोबा येथील विद्यार्थी प्रदिप वसंत पवार यांचे पेंटिंग्ज (Paintings) सध्या सोशल मोडियावर (Social Modia) व्हायरल होत आहे. सुरेख आणि मनमोहन रेखाटन-रंगभरण यामुळे त्याचे पेंटींग्ज पहाणाऱ्यांचे पटकन लक्ष वेधून घेत आहेत. त्या अनुषंगाने प्रदीपशी संवाद साधला.

आपल्या पेंटिंग्ज विषयी व शिक्षणाविषयी सांगतांना तो म्हणाला, माझा जन्म १० एप्रिल २००१ रोजी नेवासा तालुक्यातील घोडेगाव (Ghodegoan) येथे झाला. वडील आरोग्य विभागात हिवताप निर्मूलन आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे जिल्ह्यात कायम बदली होत असल्याने आम्ही अनेक गावे फिरलो आणि शेवटी सेवानिवृत्तीचया वेळी वडाळा बहिरोबा येथे स्थायिक झालो.

माझ्या चित्रकलेच्या आवडीबाबत सांगायच ठरल तर घरात कोणीच चित्रकार नाही किंवा आर्टिस्ट (Artist) नाही. त्यामुळे हे अनुवंशान ही कला आलीय असं मुळीच नाही मी म्हणू नाही शकत. शाळेत आपल्याला चित्रकला विषय असतो. पहिली दुसरीत असताना चिमण्या पोपट, निसर्ग, कार्टूस काढत असायचो. कधीकधी पहिली दुसरीत असताना बहिणीची पण मदत घेतली चित्र काढायला ती माझ्यापेक्षा दोन वर्षानी मोठी आहे. चिमण्या, पोपट थोडं जास्तच काढायचो. एके दिवशी मी बालभारती पुस्तकावरचं दोन सायकलवस्च्या मुलांचे चित्र काढले आणि त्यापासून मी छान छान चित्र काढतच गेलो मी दररोज काहीना काही काढायचो. शाळेत तर खुप स्पर्धा दिल्या खूप स्पर्धेत माझे नंबर देखील आले, आणि त्यात पहिला माझा आणि तिचा नंबर आला तिथून पुढे चित्रकलेत माझी आवड दांडगी होत गेली मी खुप स्पर्धांमध्ये पहिला आलेलो. पाचवीला इलेमेंटरीची परिक्षा (Elementary exam) आणि सहावीला इंटरमिजिएटची परिक्षा (Intermediate exam) दिली त्यात ए ग्रेड (A grade) भेटला.

माझ्या वडिलांनी मला खुप पाठबळ दिले. त्यांनी प्रत्येक वस्तू मला पुरवली. मी म्हणायच सांगायचो त्यापेक्षा ते जास्त आणत. मी चित्र काढत असताना माझ्यासमोर बसून माझ्या चित्रांमधील चुका काढण्याचे काम ते करत असत. आठवीत असताना वाहतूक सुरक्षा नियंत्रण या स्पर्धेत महाराष्ट्रात मी प्रथम महिला आलो. तेवा मी वडिलांसोबत मुंबईला बक्षिस घेण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर मला अनेक जिल्हास्तरीय पारितोषिक मिळाले, माझ्या वडिलांचा त्या वेळी सर्वांत जास्त सपोर्ट होता. पण मी नववीत असताना त्यांचा हृदयविकाराने मृत्यु झाला. त्यातून बाहेर पडायला वेळ लागणार होता.त्यापुढे काकांनी वडिलांसारखा जीव लावून सांभाळले, ते मला आजही कलेसाठी सहकार्य करतात. मी जेव्हा जेव्हा काम करायचो, काम संपले की माझे चित्र अस्तव्यस्त पडत कधीही चागने ठेवायचो नाही. माझी आई त्या सर्व पेंटिंग्स व्यवस्थीत ठेवे, मला त्याविषयी शिकवत. या सर्वामागे या सर्वांचा खुप मोलाचा वाटा आहे.

मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट (J.J. School of Art, Mumbai) हे अत्यंत मोठे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हे महाविद्यालय आहे, येथे जाण्याचा माझे स्वप्न नववीत असताना बनले होते. मी जेंव्हा 11वी मध्ये होतो तेव्हा मला दूसरा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला. ते बारामतीचे खुप मोठे कला प्रदर्शन होते. मला जे. जे. स्कूल ऑफ आर्टची प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) दयावयाची होती. ती एवढी अवघड असते की काही विद्यार्थी 4 ते 5 वेळेस परीक्षा देऊन देखील त्यांचा नंबर तेथे लागत नाही.पण मी ती परीक्षा दिली आणि महाराष्ट्रातून प्रथम रँक प्राप्त केला. इतक्या कमी वयाचा मी पहिलाच पहिला होतो.

कॉलेजला सिलेक्शन झाल्यावर पहिल्या वर्षात परत राज्य कला प्रदर्शन परीक्षा झाली त्यात पुन्हा पारितोषिक पटकावले, असे तीन वेळेस राज्यात, तर एक वेळेस देशात मी नंबर आणला. अश्या खुप साया स्पर्धांमध्ये नंबर तर पटकावले. नंतर मी माझे सिलेक्शन एटोरेंट वॉल चित्रकला यासाठी उत्तराखंड मध्ये झाले. तेथे खुप सध्या पेंटिंग्ज केल्या. आज पर्यंत 150 हुन अधिक पेंटिंग्ज केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक सोहळ्याचे पेंटिंग्ज करण्यासाठी ऑइल पेंट व कॅनव्हासचा वापर केला. हे पेंटिंग तयार करायला मला 25 दिवस लागले. सध्या फाईन आर्ट च्या कोर्सचे हे माझे दुसरे वर्ष आहे. फाईन आर्टचा चार वर्षाचा कोर्स पूर्ण झाल्यावर व्यावसायिक आणि संकल्पना कलाकार म्हणून काम करण्यासह आंतरराष्ट्रीय चित्रकार होण्याचे स्वप्न आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com