प्रभारी अधिकारी अभिनव यांनी स्विकारला नेवासा पोलीस ठाण्याचा पदभार

प्रभारी अधिकारी अभिनव यांनी स्विकारला नेवासा पोलीस ठाण्याचा पदभार

नेवासा |तालुका वार्ताहर|Newasa

नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची नगर येथे नियंत्रण कक्ष विभागात बदली झाली

असून उत्तरप्रदेश आग्रा येथून आलेले आयपीएस दर्जाचे अधिकारी अभिनव त्यागी यांनी मंगळवारी प्रभारी निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. या दोन्हीही अधिकार्‍यांचा नागरिकांसह सर्वपक्षीयांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

अभिनव त्यागी यांचे स्वागत करण्यात आले तर रणजित डेरे यांना सत्कार करून निरोप देण्यात आला. सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. पोलीस निरीक्षक रणजित डेरे म्हणाले की, नेवासा पोलीस स्टेशनला मी दोन वर्षे सेवा केली.

जास्तीत जास्त केसेस सामोपचाराने निकाली निघाव्यात यासाठी केलेल्या प्रयत्नांना नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यानी प्रतिसाद दिला. सकारात्मकदृष्टीने न्याय देण्याचा प्रयत्न केला याचे समाधान वाटते. सर्व जातीधर्माच्या लोकांनी देखील सहकार्य केल्याने जातीय सलोखा देखील वृद्धिंगत झाला. चांगले काम केल्याचे समाधान वाटते, अशा भावना व्यक्त केल्या.

प्रभारी निरीक्षक अभिनव त्यागी म्हणाले, नेवासा पोलीस स्टेशनला प्रभारी म्हणून तीन महिन्यांचा कार्यभार माझ्याकडे असणार आहे. यामध्ये सर्वांना न्याय देण्याची भूमिका राहील. शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माझा प्रयत्न राहील त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, वंचीत बहुजन आघाडीचे संजय सुखधान, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन जगताप, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, दादासाहेब कोकणे, दिनकर गर्जे, अंबादास ईरले, राजेंद्र मापारी, किशोर गारुळे, इम्रान दारूवाला, सुहास पठाडे, बाळासाहेब नवगिरे,प्रा. सुनील गर्जे, शंकर नाबदे, कमलेश गायकवाड, मोहन गायकवाड, पवन गरुड, काकासाहेब शिंदे, शिवा राजगिरे, अजित नरुला यावेळी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com