नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथक स्थापन

नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथक स्थापन

नेवासा बुद्रुक |वार्ताहर| Newasa

नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार (Police Inspector Bajirao Powar) यांनी पोलीस ठाण्यात फेरबदल करण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून पोलीस ठाण्यात डी. बी. पथक स्थापन (D. B. Squad placement) केले आहे.

कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सतर्क असलेले पोलिस (Police) 24 तास ऑनड्यूटी असतात. त्यात गुन्ह्याचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत चाललेले असताना पोलिसांनाही अपडेट राहावे लागते महत्वाच्या गुन्ह्यांचा तपास करावा लागतो त्यामुळे गुन्हे उघडकीस आणणे व गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी गुन्हे शाखेसह प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत (Police Station) गुन्हे प्रकटीकरण पथक (डीबी स्क्वॉड) स्थापन (D. B. Squad placement) करण्यात आलेला असतो त्याच प्रमाणे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार (Police Inspector Bajirao Powar) यांनी तत्काळ या पथकाची स्थापना करून तालुक्यातील अवैध धंदे चालवण्यार्‍याची पळता भुई केली आहे

डी. बी पथकाच्या माध्यमातून गावठी कट्टे, गुटखा, मावा, मटका, सट्टेबाजी, गोमांस , वेश्या व्यवसाय, बिंगो, रेशन तस्करी, गांजा तस्करी, रस्ता लूट, जबरी चोर्‍या, मोटरसायकल चोरी, हायवेवर होणार्‍या रस्ता लुटीचें प्रकार, अवैध दारू, बनावट दारू बनवणारे रॅकेट, गारगोटी, जमिनी ताबा, डिझेल चोरी, भुरट्या चोर्‍या आदि गोष्टीवर कारवाई करणार आहे.

पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येक गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी डीबी स्क्वॉड काम करत असते. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची कुठे उठबैस आहे, त्यांचे मित्र, कुटुंबाविषयक माहिती, फोटो यासह त्यांची माहिती तयार करून हद्दीत चांगले सोर्स अर्थात खबरे पेरण्याचे काम या पथकामार्फत अपेक्षित असते यासह अश्या अनेक गोष्टीवर कारवाई साठी पथकाची मोहीम सुरू राहणार असल्याचे यावेळी पोवार यांनी सांगितले.

डी. बी. पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढणार असून येणार्‍या काही दिवसांत तालुका गुन्हेगारी मुक्त करू.

- बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक नेवासा

डी. बी. पथकात उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस नाईक बबन तमनर, पोलीस कॉन्स्टेबल केवलसिंग राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास गिते, पोलीस कॉन्स्टेबल माने आदींचा समावेश आहे. या पथकातील कर्मचार्‍यांना साध्या वेशात राहण्याची मुभा देखील असणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com