दोन लहान मुलींसह बेपत्ता महिलेस शोधण्यात पोलिसांना यश

दोन लहान मुलींसह बेपत्ता महिलेस शोधण्यात पोलिसांना यश

नेवासा | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील चिलेखनवाडी येथून दोन लहान मुलींसह बेपत्ता असलेल्या महिलेला शोधण्यात नेवासा पोलिसांना यश मिळाले आहे.

तालुक्यातील चिलेखनवाडी येथील महिला शितल विठ्ठल बोरुडे (वय 30 वर्षे) ही तिच्या मुली राजश्री विठ्ठल बोरुडे (वय 10 वर्ष), तन्वी विठ्ठल बोरुडे (वय 07 वर्षे) या दि. 15 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजे पासून बेपत्ता होत्या.

दोन लहान मुलींसह बेपत्ता महिलेस शोधण्यात पोलिसांना यश
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

महिलेचे वडिल बाप्पु रामा निकाळजे (वय 55 वर्षे) यांनी दि.22 डिसेंबर 2021नेवासा पोलीस ठाण्यात खबर दिली होती. त्यानुसार नेवासा पोलिस ठाण्यात रजिस्टर न. 103 /21 नुसार मिसिंग दाखल होती.

पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांचे पथकाने कसोशीने शोध घेतला असता दि.31 डिसेंबर रोजी सदर महिला व तिच्या दोन मुली नेवासा तालुक्यातील गेवराई येथे सुखरुप मिळुन आलेले आहेत.

दोन लहान मुलींसह बेपत्ता महिलेस शोधण्यात पोलिसांना यश
भाग्यश्रीच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

सदर महिलेने स्वखुशीने दुसरा विवाह केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.

दोन लहान मुलींसह बेपत्ता महिलेस शोधण्यात पोलिसांना यश
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com