नेवासा पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद ; 8 गुन्हे उघडकीस

शिरसगाव : मेडीकल दुकान, सलाबतपूर : कापड दुकान, जेऊरहैबती : किराणा दुकान चोरी, नेवासाफाटा : बुलेट चोरी, माळीचिंचोरा रस्तालूट
नेवासा पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद ; 8 गुन्हे उघडकीस

नेवासा (का. प्रतिनिधी) - नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील 4 महीन्यापासून झालेल्या चोरी, घरफोडी, रस्तालूट आदी गुन्ह्यांतील आरोपींचा तपास करुन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना यश आले आहे. या आरोपींनी नेवासा तालुक्यात 8 गुन्हे केले आहेत तर त्यांच्या नावावर अन्य पोलीस ठाण्यांमध्ये 38 गुन्हे दाखल आहेत.

शिरसगाव येथील श्रेयस मेडीकल हे औषधी दुकान फोडून चोरी केलेल्या प्रकरणी प्रवरासंगमचा आतिष सुरज पवार व मुन्ना उर्फ रोहीत गोडाजी चव्हाण रा.अशोकनगर ता. श्रीरामपुर यांनी एकजित गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्याच्यावर भादंवि.क.457, 380 अन्वये दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक श्री. नागरगोजे व उपनिरीक्षक भरत दाते यांनी केला आहे.

3 मार्च 2021 रोजी हॉटेल औदुंबरसमोर ट्रक अडवू चालकास मारहाण करुन नत्याच्याकडून 45 हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली होती. याबाबत गुरनं.122/21 भादंवि.क.395 अन्वये दाखल गुन्ह्यातही आतिष सुरज पवार रा.प्रवरासंगम ता.नेवासा तसेच ज्ञानेश्‍वर उर्फ माउली राउसाहेब पिंपळे रा.जुने कायगाव ता.गंगापूर जि.औरंगाबाद, करण उर्फ दादु भिमा पवार रा.हरेगाव ता. श्रीरामपूर, अजय उर्फ डुड्या चव्हाण, रहेमान उर्फ रहीम पठाण रा. सातोना खु.ता. परतूर जि.जालना व सलीम होख यांनी एकत्रित गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपी क्र.1ते3 यांना अटक केलेली आहे. आरोपींकडून मुद्देमाल (रोख रक्कम 14 हजार रुपये) हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक शेवाळे, कॉन्स्टेबल शिंदे यांनी केला आहे.

गेल्यावर्षी 24 डिसेंबर रोजी सलाबतपूरचे साहिल कलेक्शन हे कापड दुकान फोडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता याबाबत गुरनं.967/20 भारदवि.क. 457, 380 अन्वये दाखल गुन्ह्यात आतिष सुरज पवार रा. प्रवरासंगम ता.नेवासा तसेच विधीसंघर्षित बालक व मुन्ना उर्फ रोहीत गोडाजी चव्हाण रा.अशोकनगर ता. श्रीरामपुर यांनी एकजित गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर करत आहे.

7 जानेवारी 2021 रोजी जेऊरहैबती येथे किराणा दुकान फोडून 35 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुरनं.74/21 भादंवि.क. 461, 380 अन्वये दाखल गुन्ह्यात आतिष सुरज पवार व ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली रावसाहेव पिंपळे रा.जुने कायगाव ता. गंगापूर, करण उर्फ दादु भिमा पवार रा.हरेगाव ता. श्रीरामपूर व अजय ऊर्फ डुड्या दत्तू चव्हाण यांनी एकजित गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. वरील आरोपींना वर्ग करुन पुढील तपास उपनिरीक्षक भरत दाते व हवालदार श्री. ठोंवरे करत आहे.

7 जानेवारी रोजी भेंडा बुद्रुक येथील दुकान फोडुन 69,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या गुन्ह्यातही वरील आरोपींना अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक भरत दाते व हवालदार श्री. ठोंबरे करत आहे.

20 जानेवारी 2021 रोजी नेवासाफाटा येथून बुलेट गाडी चोरी करुन नेल्याची घटना घडली होती. याबाबत गुरनं.40/21 भादंवि.क. 379 अन्वये दाखल आहे. सदर गुन्हा आतिष सुरज पवार रा.प्रवरासंगम व2 दलीप मोहन चव्हाण रा.वडाळा महादेव ता. श्रीरामपुर यांनी एकजित गुन्हा केल्याची कबुली दिली असून बुलेट गाडी पोलीसांनी जप्त केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक भरत दाते, पोना.यादव, पोलीस नाईक महेश कचे, कॉन्स्टेबल वसीम इनामदार, श्री. इथापे पोलीस नाईक श्री. तोडमल हे करीत आहे.

20 फेब्रुवारी रोजी माळीचिंचोरा येथे ट्रक अडवून चालकास मारहाणू करुन साडेतेरा हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत गुरनं. 94/20 219 भादंवि.क.392अन्वये गुन्हा दाखल होता. तपास उपनिरीक्षक भरत दाते हे करीत असून वर्रील दाखल गुन्ह्यातील आरोपी हे निष्पत्र झाले असुन गुन्हा उडडकीस आला आहे. आरोपी हे इतर गुन्ह्यात पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असल्याने सदरचे रिमांड संपताच वर्ग करुन घेवुन तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.

बाभुळवेढा येथे रात्रीच्यावेळी दरवाजा तोडून मारहाण करुन 75 हजार 500 रुपयांची चोरी केल्याची घटना 17 मार्च रोजी घडली होती. याबाबत गुरनं.160/20 21 भादंवि.क.397 अन्वये गुन्हा दाखल होता. याप्रकरणी तपास करुन वरील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. करुन गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक भरत दाते हे कर्रीत आहे. आरोपी हे इतर गुन्ह्यात पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असल्याने सदरचे रिमांडसंपताच वर्ग करुन घेवुन तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.

अटकेतील आरोपींवर अन्य पोलीस ठाण्यांत 38 गुन्हे

अटकेतील आरोपींवर नेवासा पोलीस ठाण्याव्यतिरिक्त राज्यातील अन्य पोलीस ठाण्यांमध्ये 38 गुन्हे दाखल आहेत. त्यात सर्वाधिक 9 गुन्हे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात, 8 गुन्हे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात, संगमनेर (2), विरगाव ता. वैजापूर (3), गंगापूर (2), वडगाव निंबाळकर (बारामती)-1, छावणी (औरंगाबाद)-1), कन्नड, उस्मानपुरा, पंचवटी (नाशिक), आडगाव (नाशिक), शेवगाव, शिर्डी, आश्‍वी, पाचोड (जि. जालना) या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण 38 गुन्हे दाखल आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com