नेवासाफाटा येथील आठवडे बाजारात मोबाईल चोर रंगेहाथ पकडला

धुलाई करून दिले पोलिसांच्या ताब्यात
नेवासाफाटा येथील आठवडे बाजारात मोबाईल चोर रंगेहाथ पकडला

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

येथील काल गुरुवारच्या आठवडे बाजारात दुपारी दोनच्या सुमारास एका सराईत मोबाईल चोराला पकडून बाजारकरुंनी त्याची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर त्याला नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

नेवासा फाटा येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. परिसरातील अनेक जणांचे मोबाईल या बाजारात चोरीस गेले आहेत. बाहेरून येणार्‍या या चोरांनी बाजारात उच्छाद मांडला होता. प्रत्येक गुरुवारी आठवडे बाजारात कोणाचा ना कोणाचा मोबाईल कायम चोरीस जात होता. या प्रकाराला येथील नागरिक, बाजारकरू, व्यापारी कंटाळले होते.

काल दुपारी दोन वाजता बाजारकरुंनी एका मोबाईल चोराला रंगेहाथ पकडून त्याची यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर या मोबाईल चोराला बांधून नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या चोरट्याचे नाव कृष्ण कदम (वय 30) रा. बीड असे असून त्याचा एक सहकारी बाजारातून पळून जाण्यात यशस्वी झाला. चोराला करण्यात आलेल्या या मारहाणीच्या प्रकारामुळे चोरट्यांवर जरब बसून मोबाईल चोरीचे प्रमाण कमी व्हावे, अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com