नेवासा फाटा येथील पतंजली कंपनीची फसवणुक करणारा आरोपी जेरबंद

दहा दिवसांची पोलीस कोठडी; आरोपी ट्रकचालक पुणे जिल्ह्यातील
नेवासा फाटा येथील पतंजली कंपनीची फसवणुक करणारा आरोपी जेरबंद

नेवासा |का. प्रतिनिधी|Newasa

नेवासाफाटा येथील पतंजली प्रायव्हेट लिमिटेड येथून 15 ऑक्टोबर रोजी 66 लाख 34 हजार 68 रुपये किंमतीच्या

गायीच्या तुपाच्या बॉक्सच्या ट्रकची परस्पर विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणातील एका आरोपीला नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुणे येथून अटक केली असून त्यास नेवासा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. नेवासा पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, 15 ऑक्टोबर 2020 रोजी पतंजली परिवहन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नेवासाफाटा येथून एस. एस. ट्रान्सपोर्ट कंपनी औरंगाबाद मार्फत ट्रकमधून (एमएच 14 सीपी 2781) एकूण 66 लाख 34 हजार 68 रुपये किंमतीचे गायीच्या तुपाचे 850 बॉक्स लोड करून हा ट्रक हवेली (जि. पुणे) येथील प्रो बडी बॅलेन्स प्रा. लि. येथे पोहच करण्यासाठी ट्रक चालकाच्या ताब्यात देऊन रवाना करण्यात आले होते.

सदर ट्रक चालकाने सदरचा माल पुणे येथे पोहच न करता सदर मालाची कोठेतरी विल्हेवाट लावून फसवणूक केल्याने याबाबत अमोल भाऊसाहेब थोरात यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्हा घडल्यानंतर नगरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मदतीने गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना श्री. कटके यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा राजेश लिलाधर वेद (रा. मावळ जि. पुणे) याने केला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश इंगळे, हवालदार मनोज गोसावी, हवालदार दत्ता गव्हाणे, पोलीस नाईक विशाल दळवी, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, कॉन्स्टेबल सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, रोहित येमुल व चालक हवालदार श्री. कोतकर यांनी पुणे येथे जावून आरोपीचा शोध घेऊन राजेश लिलाधर वेद (वय 50) रा. सोमाटणे फाटा ता. मावळ (जि. पुणे) यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने नेवासा पोलीस ठाण्यात नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नेवासा पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com