नेवासाफाटा येथील राजमुद्रा चौकात आणखी एक अपघात

नेवासाफाटा येथील राजमुद्रा चौकात आणखी एक अपघात

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावर नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकामध्ये नवीन रस्ता दुभाजकाचे काम करण्यात आले आहे. सदर रस्ता दुभाजक चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आल्यामुळे व दिशादर्शक किंवा इतर कोणतेही फलक न लावल्यामुळे सदर रस्ता दुभाजकावर वारंवार अपघात होत आहेत. हे चुकीचे रस्ता दुभाजक काढून टाकावे अथवा दिशादर्शक व इतर उपाययोजना करावी, अशी मागणी येथील व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

राजमुद्रा चौकातील कल्पवृक्ष सोसायटीकडे जाणार्‍या रस्त्याला ठेवण्यात आलेले रस्ता दुभाजक चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याने सदर रस्त्यावर वारंवार अपघात होऊन जीवित व वित्तहानी होत आहे. या अपघातामुळे अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. सदर रस्ता दुभाजकाची उंची अतिशय कमी असल्याने व कोठेही रेडियम सदृश रिफ्लेक्टर न लावल्याने वाहने दुभाजकावर जात आहेत. अशावेळी अनेक वाहने एकमेकांवर आदळून भीषण अपघात होत आहेत.

त्यामुळे राजमुद्रा चौक ते कल्पवृक्ष सोसायटीकडे जाणार्‍या रस्त्याच्या दरम्यान बसवण्यात आलेला दुभाजक तात्काळ काढून टाकावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. नगरकडे जाणार्‍या वाहनांना तसेच कल्पवृक्ष सोसायटीकडे वळणार्‍या वहानांना या रस्ता दुभाजकामुळे अडचण निर्माण होत आहे. याठिकाणी अपघातामुळे अनेकदा प्रवाशांना जीवही गमवावा लागला आहे. भरधाव वाहनांमुळे राजमुद्रा चौक हा मृत्यूचा सापळा बनला आहे. याबाबत वेळीच योग्य तो निर्णय घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com