नेवासात मारहाण करून प्रवाशाला 40 हजारास लुटले

नेवासात मारहाण करून प्रवाशाला 40 हजारास लुटले

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar

नेवासाफाटा येथून श्रीरामपूरकडे येत असताना बेलपिंपळगाव शिवारात शनिवारी रात्री तिघा चोरट्यांनी 40 हजार रुपयांच्या रकमेसह

42 हजार 700 रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रतन मानसिंग आगारे (वय 42) रा. पुर्णवादनगर, वॉर्ड नं. 7 श्रीरामपूर धंदा-श्रीरामपूर आगारात वाहक म्हणून नोकरी यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 5 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील त्यांच्या भाच्याकडून घराचा हप्ता भरण्यासाठी 40 हजार रुपये घेऊन येत होतो.

नेवासाफाट्यापर्यंत एसटी बसने आल्यानंतर तेथून पुढे बोलेरो जीपमधून श्रीरामपूरकडे येत असताना जीपमधील तिघांनी बेलपिंपळगाव शिवारातील वीज सबस्टेशनसमोर जीप आल्यावर शिवीगाळ केली व पैसे काढ असे म्हणून हाताने व त्यांच्या हातातील स्टीलच्या कड्याने मारहाण करून फिर्यादीच्या खिशातील 40 हजार 500 रुपये (दोन हजार रुपये किंमतीच्या 20 नोटा व 500 रुपयांची एक नोट) तसेच 2 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून घेतला.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 684/2020 भारतीय दंड विधान कलम 394, 504 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत दाते करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com