सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथे मंगळवारी दुपारी अज्ञात चोरट्याने बंद घरातून तीन तोळे सोन्याचे दागिने व

रोख एक लाख रुपये असा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सोनई पोलीस स्टेशनकडून समजलेली माहिती अशी की, बाबासाहेब होनाजी वायभासे (वय 48) रा. पानसवाडी ता. नेवासा यांनी फिर्याद दिली की पानसवाडी येथे राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूपकडी तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटातील 25 हजार रुपये किमतीचा दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 25 हजार रुपयांचा दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 12 हजार 500 रुपयाची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 12 हजार 500 रुपयाची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे तीन तोळ्याचे दागिने तसेच रोख एक लाख रुपयांची रोख रक्कम (500 व 100 रुपयाच्या नोटा) असा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.

या फिर्यादीवरून सोनई पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. टी. करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.