नेवासा तालुक्यात सर्वच पुरुष जिल्हा परिषद सदस्यांची झाली अडचण

आरक्षण सोडत || 8 पैकी 7 गट महिलांसाठी एक गट अनुसूचित जाती व्यक्तीसाठी || पंचायत समितीचे 16 पैकी 8 गण महिलांसाठी || सलाबतपूर, कुकाणा, चांदा, खामगाव सर्वसाधारण
नेवासा तालुक्यात सर्वच पुरुष जिल्हा परिषद सदस्यांची झाली अडचण

नेवासा |का.प्रतिनिधी| Newasa

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत नगर येथे तर पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत नेवासा येथील तहसील कार्यालयात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे 8 पैकी 7 गट विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहेत तर एक गट अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने सर्वच विद्यमान पुरुष जिल्हा परिषद सदस्यांची अडचण झाली. तर पंचायत समितीचे चार गण सर्वसाधारणसाठी खुले झाल्याने या गणांमध्ये स्पर्धा होणार आहे.

नेवासा तहसील कार्यालयात निवडणूक अधिकारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, प्राधिकृत नियंत्रक अधिकारी जयश्री आव्हाड व नायब तहसीलदार रावसाहेब बोरुडे यांनी पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढली.

पंचायत समितीच्या 16 गणांपैकी 8 गण विविध प्रवर्गांतील महिलांसाठी राखीव आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी मुकिंदपूर, भानसहिवरे, खरवंडी, शिंगणापूर व सोनई हे 5 गण राखीव आहेत. ओबीसी महिलांसाठी बेलपिंपळगाव व भेंडा बुद्रुक हे दोन गण आहेत तर अनुसूचित जमाती महिलेसाठी प्रवरासंगम गण राखीव झालेला आहे.

सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी खामगाव, सलाबतपूर, कुकाणा व चांदा हे चार गण आहेत. ओबीसींसाठी देडगाव व करजगाव हे दोन गण तर अनुसूचित जमातीसाठी पाचेगाव व अनुसूचित जातीसाठी घोडेगाव असे आरक्षण आहे.

जिल्हा परिषद गटांसाठीच्या आरक्षणात सर्वसाधारण, ओबीसी व अनुसूचित जमातीच्या पुरुषांना उमेदवारी दाखल करण्यासाठी एकही गट उपलब्ध राहिलेला नाही. 8 पैकी 7 जागा विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर पाचेगाव गटाची एकमेव जागा महिलांसाठी आरक्षीत नसून ती अनुसूचित जमातीसाठी आहे.

जिल्हा परिषद गटांमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी सलाबतपूर, भेंडा बुद्रुक व शिंगणापूर हे गट आहेत. ओबीसी महिलांसाठी भानसहिवरे व सोनई हे दोन गट आहेत. अनुसूचित जाती महिलेसाठी चांदा गट आरक्षीत आहे. अनुसूचित जमाती महिलेसाठी बेलपिंपळगाव गटाचे आरक्षण आहे तर अनुसूचित जमातीसाठी पाचेगाव गट आरक्षीत आहे.

पंचायत समित्यांचे आरक्षण -

सर्वसाधारण गण- खामगाव, सलाबतपूर, कुकाणा व चांदा.

सर्वसाधारण महिला- मुकिंदपूर, भानसहिवरे, खरवंडी, शिंगणापूर व सोनई.

ओबीसी- देडगाव व करजगाव.

ओबीसी महिला- बेलपिंपळगाव व भेंडा बुद्रुक

अनुसूचित जाती- घोडेगाव अनुसूचित जाती महिला- प्रवरासंगम.

अनुसूचित जमाती- पाचेगाव

अशा प्रकारे आरक्षित गण निश्चित करण्यात आले.

सर्वच विद्यमान पुरुष जिल्हा परिषद सदस्यांची अडचण

सर्व 8 जिल्हा परिषद सदस्यांच्या जागांपैकी 7 जागा महिलांच्या विविध प्रवर्गांसाठी राखीव झालेल्या असल्याने विद्यमान सदस्य असलेले भेडा बुद्रुक गटाचे दत्तात्रय काळे, खरवंडी गटाचे सुनील विश्वासराव गडाख व बेलपिंपळगाव गटाचे दादासाहेब चंद्रभान शेळके यापैकी कोणालाच आता पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरता येणार नाही. माजी पंचायत समिती सदस्या सुनीताताई गडाख यांचा सोनई गण ओबीसी महिलेसाठी राहिला असून गटही सर्वसाधारणसाठी आहे. यावेळी जिल्हा परिषद लढवायची असली तरीही त्यांना अडचण नाही. जवळपास कोणत्याच विद्यमान महिला सदस्यांना आरक्षणाची फारशी अडचण नाही.

पंचायत समिती सदस्यांमध्ये खामगाव, सलाबतपूर, कुकाणा, व चांदा हे गण सर्वसाधारणसाठी खुले झाले आहेत. या गणांमध्ये मोठी स्पर्धा असणार आहे. 16 पैकी 8 गण महिलांसाठी आहेत.

जिल्हा परिषद आरक्षण -

1) बेलपिंपळगाव - अनुसूचित जमाती महिला

2) सलाबतपूर - सर्वसाधारण महिला

3) भेंडा बुद्रुक - सर्वसाधारण महिला

4) भानसहिवरे - ओबीसी महिला

5) पाचेगाव - अनुसूचित जमाती

6) शिंगणापूर - सर्वसाधारण महिला

7) सोनई - ओबीसी महिला

8) चांदा - अनुसूचित जाती महिला

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com