चिलेखनवाडी वीज उपकेंद्र सील करण्याची नोटीस

चिलेखनवाडी वीज उपकेंद्र सील करण्याची नोटीस

नेवासा (तालुका प्रतिनिधी)

तालुक्यातील चिलेखनवाडी येथील 33/11 के.व्ही. वीज उपकेंद्राकडे मागील तीन वर्षाचा मालमत्ता कर थकीत आहे. महापारेषन कंपनीस वेळोवेळी तोंडी व लेखी मागणी करूनही थकबाकी भरणा न केल्याने ग्रामपंचायतीने अखेर सात दिवसात थकीत कर भरणा न केल्यास वीज उपकेंद्र सील करण्याची नोटीस दिली असल्याची माहिती सरपंच प्रा. भाऊसाहेब सावंत यांनी दिली.

चिलेखनवाडी येथे उपकेंद्र स्थापन झाल्यापासून ग्रामपंचायत सदर उपकेंद्राकडून मालमत्ता कर वसूल करते. परंतु वेळोवेळी मागणी बील देऊनही महापारेषन कंपनीने भरणा केलेला नाही. मात्र येथील प्राथमिक शाळेचे चालू विजबील ग्रामपंचायतने भरणा न केल्याने वीजपुरवठा खंडीत केला आहे. ग्रामपंचायतची मागील तीन वर्षाची 4 लाख 77 हजार 811.47 रुपये थकबाकी भरणा न केल्याने पदाधिकाऱ्यांनी उपकेंद्र सील करण्याचा निर्णय घेतला .

ऐन नवरात्र उत्सवात उपकेंद्र सील केल्यास येथून वीजपुरवठा होणारी देवसडे, तेलकुडगाव, अंतरवाली, वडुले, कुकाणा, सुकळी, नांदूर शिकारी, पिंपरी शहाली, पाथरवाले, इत्यादी गावे अंधारात जाणार असून चिलेखनवाडी येथील लोचनाबाई ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प बंद पडणार असल्याने नगर जिल्हयातील अनेक रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यास अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागतील. याची संपूर्ण जबाबदारी पारेषन कंपनीच्या थकबाकी भरणा करण्यास दिरंगाई करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांची राहिल असे उपसरपंच नाथा गुंजाळ व ग्रामसेविका कविता शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.