VIDEO : पाचेगाव पुलाला लागले पाणी

VIDEO : पाचेगाव पुलाला लागले पाणी

पाचेगाव | वार्ताहर

मुसळधार पावसामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील प्रवरा नदीवरील पुलाला पाणी लागल्‍याने तालुका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी इमामपूर व पाचेगाव येथील तलाठी यांना घटनास्थळी थांबण्याचे आदेश दिले असून पाणी कमी होई पर्यंत पुलावरून येण्या जाण्यासाठी तात्पुरती बंद करण्यात यावी असे सांगितले आहे. तसेच घटनास्थळी पोलीस कर्मचारी देखील हजर राहण्याची सूचना दिल्या आहे.

दरम्यान पाचेगाव साईडने पाणी वाहून जात असलेल्या जेसीबीच्या साह्याने त्या ठिकाणी मुरूम टाकण्याचे काम देखील सुरू होणार आहे. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवरा नदीच्या पुलावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com