नेवासा नगरपंचायत मतदार याद्यांवर हरकतींचा आज शेवटचा दिवस

आतापर्यंत 172 हरकतींची नोंद
File Photo
File Photo

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा नगरपंचायतीच्या जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार आज सोमवार दि. 27 जून रोजी प्रारुप मतदार यादीवरील हरकती स्विकारण्याचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत 172 हरकती दाखल झालेल्या आहेत.

13 जून रोजी नगरपंचायतची प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार 2011 च्या जनगणनेनुसार दि. 21 जून रोजी 17 प्रभागांच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. या याद्यांबाबत नागरिकांच्या हरकती स्विकारण्याचा कालावधीचा सोमवार दि. 27 जून पर्यंत असून अंतिम मतदार यादी 1 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

रविवार दि. 26 जून पर्यंत 172 हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये मतदार राहत असलेल्या प्रभागातून त्याचे दुसर्‍या प्रभागातील मतदार यादीत नावे असल्याच्या हरकती जास्त आहेत. आज हरकती नोंदवण्याचा शेवटचा दिवस असल्याने आपली नावे प्रभागातील मतदार यादीत आहेत का? याबाबत किती हरकती दाखल होतील हे स्पष्ट होणार आहे .

प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग 1 ते 17 याद्यांमधील आपल्या प्रभागातील मतदारांची नावे यादीत आहेत की नाहीत की ती दुसर्‍या प्रभाग यादीत आहेत याची खातरजमा करून इच्छुक उमेदवार हरकती नोंदवत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com