नेवासा नगरपंचायतीसाठी 10 कोटीचा निधी मंजूर

नेवासा नगरपंचायतीसाठी 10 कोटीचा निधी मंजूर

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

जलसंधारण मंत्रीशंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून नेवासा नगरपंचायत इमारत व विविध विकास कामांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

नेवासा नगरपंचायतीची इमारत नेवासा सत्रन्यायालया शेजारील जागेत होणार असून या इमारतीस 6.40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच नगरपंचायत हद्दीतील काटे महाराज आश्रम, अहिल्यानगर येथे सभामंडपाच्या बांधकामसाठी 1.54 कोटी, शहरातील बाजारतळ काँक्रिटीकरणासाठी 45 लाख, हंडीनिमगाव रस्ता ते उस्थळ रस्ता डांबरीकरणासाठी 76 लाख, शंकरराव लोखंडे वस्ती ते भालसिंग वस्ती रस्ता डांबरीकरणासाठी 65 लाख तर नगरपंचायत हद्दीतील गुरुद्वारासमोर रस्त्यास लादीकरण कामासाठी 20 लाख असा एकूण 10 कोटीचा निधी तात्काळ नगरपंचायतला वितरित करण्याचे आदेश सचिव विवेक कुंभार यांनी दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com