नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारपासून प्रभाग रचना कार्यक्रम

नगरपंचायतचा कार्यकाल 18 जूनला संपणार
नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारपासून प्रभाग रचना कार्यक्रम

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा नगरपंचायतीचा कार्यकाल 18 जून रोजी संपत असून नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम पूर्वी स्थगित करण्यात आलेल्या टप्प्यापासून सुरु करण्यात येत आहे. मंगळवार 10 मे पासून प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती घेता येणार आहेत.

याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आदेश जारी केला आहे. त्यानुसार 10 मे ते 14 मे पर्यंत हरकती-सूचना सादर करता येणार आहेत. 23 मे पर्यंत जिल्हाधिकारी या हरकती-सुचनांवर सुनावणी घेतील.

30 मे पर्यंत हरकती व सुचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देवून संबंधीत विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठवतील. संबंधित विभागीय आयुक्तांकडून 6 जूनपर्यंत प्रभाग रचनेस अंतिम मान्यता दिली जाईल. 7 जून पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडून अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.