नेवाशाच्या प्रारुप मतदार याद्यांवर 475 हरकती

File Photo
File Photo

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यानंतर नेवासा नगरपंचायत होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसुचित जमाती तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणाच्या सोडती करिता आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्याप्रमाणे दि.13 जून रोजी हा आरक्षण सोडत कार्यक्रम पार पाडला होता .

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 - 2022 कार्यक्रमानुसार 2011 च्या जनगणनेनुसार दि. 21 जून रोजी 17 प्रभागाच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येऊन या याद्यांबाबत नागरिकांच्या हरकती स्विकारण्याचा कालावधी सोमवार दि. 27 जूनपर्यंत होता. अंतिम मतदार यादी 1 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सोमवार दि. 27 जून पर्यंत 475 हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये मतदार राहत असलेल्या प्रभागातून त्याचे दुसर्‍या प्रभागातील मतदार यादीत नावे असल्याच्या हरकती जास्त आहेत.

आज हरकती नोंदवण्याचा शेवटचा दिवस असल्याने नागरिकांनी आपली नावे प्रभागातील मतदार यादीत आहेत का याची खात्री करून दुसर्या प्रभाग यादीत नावे गेलेल्यांनी हरकती नोंदवल्या. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग 1 ते 17 याद्या मधील प्रभागातील मतदारांच्या रविवार पर्यंत आलेल्या हरकती बाबत प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी बाबत प्रत्येक नोंदवलेल्या हरकतीची शहनिशा करण्याचे काम कर्मचारी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन करत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com