नेवासा, मुकिंदपूर व सोनईत आढळला प्रत्येकी एक संक्रमित

तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 370 वर
नेवासा, मुकिंदपूर व सोनईत आढळला प्रत्येकी एक संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात काल तिघे करोना संक्रमित आढळून आले तर 14 संक्रमित उपचारातून बरे झाल्याने त्यांना सोडण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील नेवासा, मुकिंदपूर (नेवासाफाटा) व सोनई येथे काल प्रत्येकी एक करोना संक्रमित आढळून आला. नेवासा तालुक्यातील करोना संक्रमितांची संख्या 370 वर गेली आहे. मागील दहा दिवसांत करोना बाधितांची संख्या वेगाने वाढली असून नेवासा शहर व नेवासाफाटा येथे वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन जनता कर्फ्यू सुरू आहे.

काल तालुक्यात केवळ तिघे संक्रमित आढळून आले. गेल्या काही दिवसांतील ही कमी संख्या असून त्यामुळे तालुक्याला थोडा दिलासा मिळाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com