नेवासा-मुकिंदपूर हंडीनिमगाव शिवरस्त्यावरील अतिक्रमण 30 एप्रिलपर्यंत काढा

जिल्हाधिकार्‍यांना न्यायालयाचे आदेश
नेवासा-मुकिंदपूर हंडीनिमगाव शिवरस्त्यावरील अतिक्रमण 30 एप्रिलपर्यंत काढा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील नेवासा-मुकिंदपूर हद्दीतील हंडीनिमगाव शिवपर्यंत रस्त्यावर झालेले अतिक्रमण 30 एप्रिल पर्यंत काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नेवासाफाटा येथील तीन गावच्या हद्दीकडे जाणार्‍या शिवरस्त्यावरील 33 फुट रस्ता अतिक्रमणातून मोकळा होणार असून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन कारवाई करणार असल्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची तयारी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेली आहे.

नेवासा-मुकिंदपूर शिवरस्त्यावर थेट हंडीनिमगांव हद्दीपर्यंत 33 फुट लांबीचा शिवरस्ता अतिक्रमाणात गुंडाळला गेलेला होता. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात श्रीधर बाबुराव चिमने यांनी याचिका दाखल केलेली होती. या याचिकेवर सुनावणी होवून 33 फुट शिवरस्ता मोकळा करुन देण्याचे आदेश औरंगाबाद खंडपिठाने दिलेले आहे.

नेवासा फाटा येथील तीन गावच्या हद्दीच्या पेचात शिवरस्त्यांचा श्वास कोंडलेला आहे. महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शिवरस्त्यांची मोकळी जागा रस्त्यावर अतिक्रमण करुन कोंडून टाकलेली होती. त्यामुळे शिवरस्ते अतिक्रमाणात अडकल्यामुळे शिवरस्तेच गायब झालेले आहेत. यामुळे रस्त्याचा पेचप्रसंग उभा राहीलेला आहे अतिक्रमाणात अडकलेले रस्ते खुले करण्याची मागणी याचिकाकर्ते चिमणे यांनी खंडपिठात केलेली होती. या अपिलावर सुनावणी होवून खंडपिठाने अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना शिवरस्ते मोकळे करण्याचा आदेश दिला आहे.

Related Stories

No stories found.