नेवासा तालुक्यातील व्यापार्‍याचे वाढदिवसाच्या दिवशीच झाले निधन

नेवासा तालुक्यातील व्यापार्‍याचे वाढदिवसाच्या दिवशीच झाले निधन

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील सोनई येथील पार्श्वनाथ मोबाईल शॉपीचे संचालक संकेत ओंकारमल भळगट (वय 33 वर्षे) यांचे करोना आजारावर उपचार घेत असताना दुदैवी निधन झाले आहे.

आज 20 एप्रिल रोजी त्याचा वाढदिवस असताना त्यांस श्रद्धांजली वाहण्याचा वाईट प्रसंग मित्र परीवारावर ओढावला आहे.

सहा दिवसापूर्वी त्यांस नगरच्या एका कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. रविवार दि.18 रोजी त्यांची तब्येत सुधारली होती. अनेक मित्र भ्रमनध्वनी वरुन त्याच्याबरोबर बोलले होते. सोमवारी रात्री त्याची प्रकृती खालावली. नगरमध्ये बेड मिळवण्यासाठी खुप प्रयत्न करुनही मिळाला नाही.

त्यास रात्री औरंगाबादला घेवून जात असताना रात्री एक वाजता त्याची प्राणज्योत मालवली. आई, वडीलास तो एकुलता एक होता. तो महावीर पेठेतील सेवाभावी मंडळाचा सदस्य होता. त्याच्या निधनाने संपुर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com