नेवासा बाजार समिती आवार बनले मद्यपी व जुगारींचा अड्डा

नेवासा बाजार समिती आवार बनले मद्यपी व जुगारींचा अड्डा

नेवासा फाटा |वार्ताहर| Newasa Phata

लॉकडाउन परिस्थितीमुळे नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुनसान आवारात सध्या जुगारी व मद्यपींचा धुडगूस वाढला असून त्यांच्यावर नेवासा पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी येथील व्यापारी व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

नेवासा व नेवासा फाटा परिसरात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून नेवासा नगरपंचायत व मुकिंदपूर ग्रामपंचायतीने 23 तारखेपर्यंत पूर्णपणे बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व व्यापार्‍यांनी आपापली दुकाने बंद ठेवली आहेत. परंतु याच परिस्थितीचा काही जणांकडून गैरफायदाही घेतला जात आहे. शेतकर्‍यांची कायम वर्दळ असणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारही सध्या सुनसान आहे.

याचाच गैरफायदा घेत काहीजण या जागेचा दारू पिण्यासाठी व पत्ते खेळण्यासाठी उपयोग करून घेत आहेत. या ठिकाणी पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे याचा पुरेपूर फायदा ही मंडळी उठवत आहेत. मोठ्या संख्येने गर्दी करत हे लोक पत्ते खेळण्याबरोबरच दारू पिऊन धिंगाणा घालत असल्यामुळे याठिकाणी सामाजिक शांततेचा भंग होत आहे.

त्यामुळे करोना विषाणूंचा प्रादुर्भावही वाढण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. नेवासा पोलिसांनी या परिस्थितीची पाहणी करून त्वरित हे प्रकार बंद करावेत अशी मागणी केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com