घोडेगावात कांदा आवक घटली

घोडेगावात कांदा आवक घटली

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) सोमवारी कांद्याच्या आवकेत (Onion Inward) जवळपास 9 हजार गोण्यांनी घट झाली. सोमवारी 289 वाहनांतून 52 हजार 482 गोण्या कांद्याची आवक (Onion Inward) झाली. जास्तीत जास्त भाव 3300 रुपयांपर्यंत स्थिर होते.

सोमवारी उन्हाळ कांद्यापेक्षा नवीन लाल कांद्याची आवक अधिक झाली. उन्हाळी गावराण कांद्याला 2000 ते 3300 रुपयांपर्यंत भाव मिळाला. नवीन लाल कांद्याच्या एक-दोन वक्कलला 2800 ते 3300 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मध्यम मालाला 2000 ते 2500 रुपये, गोल्टा कांद्याला 2000 ते 2200 रुपये, गोल्टी कांद्याला 1500 ते 1900 रुपये, जोड कांद्याला 400 ते 600 रुपये भाव मिळाला. हलक्या डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com