घोडेगावात उन्हाळ कांदा 3100 तर नवीन 3000 पर्यंत

घोडेगावात उन्हाळ कांदा 3100 तर नवीन 3000 पर्यंत

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी कांद्याची 245 वाहनांतून 44 हजार 619 गोण्या आवक झाली. उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त 3100 रुपये तर नवीन कांद्याला 3000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

उन्हाळ कांद्याच्या मोठ्या मालाला 2800 ते 3000 रुपयांपर्यंत, मध्यम मोठ्या मालाला 2500 ते 2800 रुपये, मध्यम मालाला 2200 ते 2300 रुपये, गोल्टा कांद्याला 1800 ते 2200 रुपये, गोल्टी कांद्याला 1200 ते 1600 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 500 ते 1500 रुपये तर एक-दोन वक्कलांना 3000 ते 3100 रुपयांपर्यंत भाव मिळाला. नवीन मालाला 500 ते 3000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com