घोडेगावात उन्हाळ कांद्याला काय मिळाला भाव

घोडेगावात उन्हाळ कांद्याला काय मिळाला भाव

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) बुधवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 3100रुपयांपर्यंत भाव मिंळाला.

बुधवारी 45 हजार 131 कांदा गोण्यांची आवक (Onion Inward) झाली होती. मोठ्या मालाला 2700 ते 2800 रुपये, मध्यम मोठ्या मालाला 2500 ते 2600 रुपये, मध्यम मालाला 2100 ते 2300 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 1200 ते 1500 रुपये, गोल्टा कांद्याला 1800 ते 2100 रुपये, जोड कांद्याला 500 ते 1500 रुपये भाव मिळाला.

एक-दोन वक्कलला 3000 ते 3100 रुपये भाव मिळाला. बाजारात नवीन कांद्याचीही आवक (New Onion Inward) होऊ लागली असून बुधवारी नवीन कांद्याला (Onion) 500 ते 2500 रुपये इतका भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com