माक्याचे लोकनियुक्त सरपंच घुले यांचेवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

माक्याचे लोकनियुक्त सरपंच घुले यांचेवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या माका ग्रामपंचायतीचे सरपंच नाथा विश्वनाथ घुले यांचेवर पाच दिवसापूर्वी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तो अविश्वास प्रस्ताव अखेर फेटाळला गेला आहे.

माका ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच नाथा घुले यांच्यावर अकरा सदस्यांनी नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे सरपंच घुले यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्या नुसार आज माका ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत अविश्वासाची प्रक्रिया होऊन त्यामध्ये आदिनाथ रामभाऊ मस्के, रमेश निवृत्ती कराळे, सौ.कमलबाई मुरलीधर लोंढे, सौ.सुशिलाबाई खंडेराव गुलगे, सौ. शोभाबाई गोरक्षनाथ घुले हे फक्त पाचच ग्रामपंचायत सदस्य हजर राहिले. तर सुदाम नामदेव घुले, देविदास जयवंत भुजबळ, सौ.सुमन अर्जुन घुले,सौ.आशाबाई दिगंबर शिंदे, सौ.उषाबाई सत्यवान पटेकर, दिगंबर तुकाराम आखाडे, सौ.वनिता दिगंबर फलके,सौ. जयश्री ज्ञानेदव सानप हे आठ ग्रामपंचायत सदस्यांनी गैरहजर राहून सरपंच घुले यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सरपंच घुले यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळला गेला. घुले यांचे वरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्याने माका गावात एकच जल्लोष झाला. अविश्वास प्रस्ताव प्रक्रियेसाठी चांदा मंडलाधिकारी मिलिंद जाधव, कामगार तलाठी झेंडे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी बि.जी.निमसे यांनी सहकार्य केले.

सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एम. दहिफळे, तुपे, अघाव व पोलीस पाटील अशोक वाघमोडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. माका ग्रामपंचायतीत एकूण तेरा सदस्य असून लोकनियुक सरपंच हे चौदावे सदस्य आहेत. यादव नाना शिंदे, रघूनाथ विश्‍वनाथ घुले, अनिल रघुनाथ घुले, त्र्यंबक विश्वनाथ घुले, पांडुरंग आप्पा घुले, जनार्दन घुले, दिनकर डमाळे, अमोल पालवे, आदिनाथ घुले, रघुनाथ पागिरे, कडुचंद म्हसके, गंगाराम पांढरे, बाबा बजांगे, संभाजी लोंढें, दिलिप घुले, स्वरूपचंद गायकवाड यांनी याकामी विशेष सहकार्य केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com