राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला मतदान कार्ड-आधार लिंकिंगचा आढावा

राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला मतदान कार्ड-आधार लिंकिंगचा आढावा

नेवासा | तालुका प्रतिनिधी

राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी नेवासा तालुक्यातील मतदानकार्ड-आधारलिंकिंगचा आढावा घेतला असून निवडणुक विषयक मतदार यादीचे कामाचा बीएलओ हा कणा असल्याचे प्रतिपादन देशपांडे यांनी केले.

शनिवार दि. १० सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर, देवगड आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर नेवासा येथे भेट दिली. सदर दौऱ्या दरम्यान नेवासा तालुक्याच्या निवडणूक कामकाजाची माहिती घेतली. या वेळी नेवासा तालुक्यातील कामकाजाबाबत तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, निवडणुक नायब तहसिलदार किशोर सानप यांचे अभिनंदन केले.

तसेच तालुक्यातील मतदान कार्ड सोबत आधार लिंकींगचे १०० टक्के कामकाज करणारे बीएलओंचे अभिनंदन केले. यात अंगणवाडी सेविका सविता नारायण दरंदले, प्राथमिक शिक्षक प्रवीण बाळासाहेब शिर्के व ग्रामसेवक अण्णासाहेब तुकाराम डेंगळे यांनी १०० टक्के काम केले. त्याबाबत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांचा सन्मान करण्यात आला. हे फोटो मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करुन राज्यातील सर्व बीएलओंचाच एकप्रकारे सन्मान करण्यात येणार आहे.

यावेळी मतदानकार्ड सोबत आधारलिंक तात्काळ करुन घेणेबाबत नागरीकांना आवाहन त्यांनी केले. निवडणुकविषयक मतदारयादीचे कामाचा बीएलओ हा कणा आहे असे उद्गार त्यांनी काढले. तसेच नेवासा तालुका सप्टेंबर अखेरपर्यंत आधारलिंकिगचे कामकाज पुर्ण करेल अशी खात्री व्यक्त केली.

यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे उपजिल्हानिवडणुक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नायब तहसिलदार गोसावी, नायब तहसिलदार रोडे हेही उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com