
सलाबतपूर | वार्ताहर
मातंग समाजाचे आराध्य दैवत असणार्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र वरखेड येथील श्रीमहालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी पाऊस सुरू असतानाही भाविकांची अलोट गर्दी जमली आहे.
आषाढ महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने भाविकांची मांदियाळी जमा होणार हे निश्चिंत होते. त्याच धर्तीवर हजारो भाविकांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. नेवासा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या हस्ते दुपारी देवीची आरती करण्यात आली.
यावेळी मंदिर समितीचे उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे, सचिव कडूपाटील गोरे, खजिनदार रामभाऊ हारदे, रमेश जगताप, रंगनाथ पवार, पोलीस पाटील संतोष घुंगासे, नवनाथ वाघ, सुरेश शिरसाठ उपस्थित होते.