नेवासा बुद्रुक शिवारातील उसात आढळला बिबट्याचा मृत बछडा

अंगावर दुसर्‍या मोठ्या प्राण्याने ओरखडल्याच्या जखमा
नेवासा बुद्रुक शिवारातील उसात आढळला  बिबट्याचा मृत बछडा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा बुद्रुक गावाच्या शिवारात विक्रम पवार या शेतकर्‍याच्या उसाच्या पिकात एक 8 महिन्याचा बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा बुद्रुकचे शेतकरी विक्रम पवार यांची भालगाव रस्त्यालगत वस्ती आहे. त्यांच्या शेती गट नंबर 195 मधील उसाच्या पिकात बुधवारी सायंकाळी बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. वनपाल मुस्ताक सय्यद, वनकर्मचारी भीमराज पाठक, आसाराम कदम, एस. डी. विधाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

वनपाल श्री.सय्यद यांनी सांगितले की, सदर मृत बिबट बछडा हा 8 ते 10 महिने वयाचा असावा. त्यांचे मानेवर दुसर्‍या प्राण्याच्या पंजाचे ओरखडे व त्यामुळे झालेल्या जखमा आढळून आल्या आहेत. त्याचेपेक्षा मोठ्या बिबट्याशी त्याचे भांडण झाले असेल किंवा इतर प्राण्याने पंजाने मारले असावे. मृत बिबट बछडा मुकींदपूर (नेवासा फाटा) येथील निसर्ग परिचय केंद्रात आणण्यात आला असून गुरुवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येऊन त्यानंतरच पुढील सोपस्कार करण्यात येणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com