नेवाशातील मंदीर रस्त्यावरील बेकायदेशीर मांस विक्रीची दुकाने बंद करा

प्रभाग 12 व 13 मधील नागरिकांची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी
नेवाशातील मंदीर रस्त्यावरील बेकायदेशीर मांस विक्रीची दुकाने बंद करा

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा (Newasa) येथील संत ज्ञानेश्वर मंदिरासह (Sant Dnyaneshwar Temple) अन्य मंदिरे असलेल्या रस्त्यावर सुरु असलेला बेकायदेशीर कत्तलखाना व मांस विक्रीची दुकाने (Illegal slaughterhouses and meat shops) बंद करण्यात यावी अशी मागणी या प्रभागातील नागरिकांनी मुख्याधिकारी (CEO) यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, संत ज्ञानेश्वर मंदिर (Sant Dnyaneshwar Temple), तुकाराम महाराज मंदिर (Tukaram Maharaj Temple) तसेच मोहिनीराज मंदिर हा दिंडी मार्ग असून राज्यभरातून आलेल्या दिंड्या तसेच दर महिन्याच्या एकादशीला या शहरातून जाणार्‍या मोहिनीराज मंदिर, व्यापारी पेठ, संत ज्ञानेश्वर चौक, लोखंडे गल्ली या रस्त्याने भाविक यामंदिरांमध्ये दर्शनासाठी जातात. याच रस्त्यावर प्रभाग क्र.12 व 13 हम रस्त्यावर नगर पंचायतची कुठलीही कायदेशीर परवानगी न घेता मांस विक्रीचे दुकाने सुरू आहेत. तसेच या ठिकाणी 2 हॉस्पीटल व 2 दवाखाने आहेत. या ठिकाणी रूग्णांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या बेकायदेशीर कत्तलखान्यामुळे (illegal slaughterhouse) रूग्णांना त्रास होतो. त्यामुळे या रस्त्यावरील बेकायदेशीर कत्तलखाना मांस विक्री दुकाने बंद करण्यात यावी.

मागील दोन महिन्यापुर्वी ही मांस विक्रीची बेकायदेशीर (illegal slaughterhouse) दुकाने पोलीस निरीक्षकांनी बंद केली होती ती पुन्हा चालु झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून नगरपंचायतच्या दुर्लक्षामुळेच नागरीकांचा आरोग्य प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाने गंभीर दखल घेवुन ही बेकायदेशीर दुकाने त्वरीत बंद करण्यात येवुन संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडुन करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.