सलाबतपुरात 9 जागा जिंकत घडवले परिवर्तन

सलाबतपूर |वार्ताहर| Salabtpur

राजकियदृष्टया महत्वाच्या असलेल्या नेवासा तालुक्यातील सलाबतपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यशवंत क्रातीकारी गटाने 11 पैकी 9 जागांवर दणदणीत विजय मिळवला असून या ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन होऊन ही ग्रामपंचायत आता गडाख गटाच्या ताब्यात आली आहे .

विजयी व पराभूत उमेदवार

प्रभाग 1- विजयी- लक्ष्मण हरिचंद्र जाधव (350) व अदिनाथ विष्णु निकम (325). पराभूत- वंदना हरिचंद्र तांबे (223) व संभाजी मधुकर निकम (258).

प्रभाग दोन -विजयी- अझहर वहाब शेख (432), सुनिता बबनराव तांबे (382) अर्चना रामेश्वर निकम (399). पराभूत- अनिस कमरूद्दीन शेख (222), शहानूर माशुम कादरी (263) सुनिता विजय तांबे (252)

प्रभाग तीन विजयी- राहुल भाऊसाहेब डोळस (318), मनिषा अशोक दाणे (383). पराभूत-विकास सुरेश कपिले (213), अश्पाक अल्लाबक्ष शेख (127) व अमृता गणेश कुर्हाडे (263)

प्रभाग चार विजयी- रोहिदास ज्ञानेश्वर भगत (455), उषा पांडूरंग वाघमारे (390) व जिजाबाई आप्पासाहेब गोरे (441). पराभूत- सुरेश यशवंत भगत (295), मंदा शिरसाठ (349) व यास्मिन अ.सत्तार शेख (309).

गळनिंबला जिंकल्या 9 पैकी 6 जागा

नेवासा तालुक्यातील गळनिंब ग्रामपंचायतीच्या नऊ जागेसाठी झालेल्या निवडणूकीत यशवंत क्रांतीकारी गटाने 9 पैकी 6 जागांवर विजय मिळवला.

या निवडणूकीत दोन गटात सरळ लढत झाली होती. तर दोन अपक्ष उमेदवांरांनीही आपले तकदीर अजमावले होते. या निवडणूकीत विजयी गटाचे नेतृत्व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके व बाजार समितीचे माजी सभापती जनार्दन शेळके यांनी केले होते. या निवडणूकीतील विजयाने ही ग्रामपंचायत गडाखांच्या ताब्यात आली आहे.

प्रभाग 1 - विजयी- अशोक हरिभाऊ घावटे (307), सोनाली अशोक शेळके (313), वैशाली बाळासाहेब शेळके (295). पराभूत- संपत गणपत शेळके (207), सरस्वती सुदाम खर्जुले (201), मीना श्याम थेवरकर (221).

प्रभाग दोन- विजयी- विजय भिमराज घावटे (261), रामदास नानासाहेब शेळके (266), मनिषा आबासाहेब हिवाळे (270). पराभूत- निलेश दादासाहेब शेळके, (207), बाळासाहेब गोरक्षनाथ शेळके (196), सुधाकर मुकिंदा हिवाळे (11), सरस्वती सुधाकर हिवाळे (14), सिंधुबाई भास्कर हिवाळे (177).

प्रभाग तीन - विजयी- विष्णू नानासाहेब शेळके (232), कुसूम बाळासाहेब खर्जुले (257), ज्योती दादासाहेब शेळके (267). पराभूत- योगेश सूर्यभान शेळके (161), लताबाई भाऊसाहेब शेळके (138), संजाबाई नामदेव शेळके (125).

बाभुळखेडेत 9 पैकी जिंकल्या 5 जागा

नेवासा तालुक्यातील बाभूळखेडे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत श्री हनुमान ग्रामविकास गटाने 9 पैकी 5 जागांवर विजय मिळवत सत्ता अबाधित राखण्यात यश मिळवले असून या ग्रामपंचायतीवर गडाखांचे वर्चस्व कायम राहीले आहे.

प्रभाग 1-विजयी- कुसुमबाई आण्णासाहेब हुसळे (224), आरती रविंद्र विधाटे (223), गंगूबाई अशोक मते (231). पराभूत- सुभद्राबाई तात्याबा कणगरे (61), अश्विनी ज्ञानेश्वर औताडे (66), ज्योती सुहास कडू (55).

प्रभाग दोन -विजयी- अशोक लक्ष्मण विधाटे (252), सुभद्राबाई तात्याबा कणगरे (257), अश्विनी उत्तम माळी (250) पराभूत- सुशिलाबाई बाळासाहेब विधाटे (220), लताबाई राजू भारस्कर (214) अंजली रामदास मोरे (220)

प्रभाग तीन -विजयी- अश्विनी ज्ञानेश्वर औताडे (402), नारायण राधाकिसन विधाटे (367), ज्योती सुहास कडू (343). पराभूत- कलाबाई सुरेश बोरूडे (232) शिवराज दादासाहेब कडू (267) मनिषा अनिल विधाटे (210).

दिघीत सत्ता परिवर्तन

नेवासा तालुक्यातील दिघी ग्रामपंचायतीच्या 9 पैकी 6 जागावंर यशवंत क्रातीकारी गटाने विजय मिळवून सत्ता परिवर्तन करण्यात यश मिळवले तर सत्ताधारी गावकरी ग्रामविकास गटाला 3 जागांवर समाधान मानावे लागले असून या ग्रामपंचायतीवर आता गडाखांचा भगवा फडकला आहे.

प्रभाग 1 विजयी- मयुर बबनराव नागोडे (299), शारदा विनायक बर्वे (260) मंगल भाऊराव ब्राम्हणे (273). पराभूत- सोमनाथ दत्तात्रय नागोडे (205) मनिषा सुनिल बर्वे (243), सुनिता किशोर गवळी (224).

प्रभाग दोन -विजयी- अदिनाथ किसन निकम (227), बेबीताई रामनाथ निकम (227), सुरेखा अदिनाथ औताडे (207). पराभूत- भाऊसाहेब भानुदास गव्हाणे (101), मिराबाई राजेंद्र नागोडे (114), शशिकला रमेश भक्त (104).

प्रभाग तीन -विजयी- दिपक पोपट मोरे (243), पोपट गोवर्धन नागोडे (233), जनाबाई जालींदर नागोडे (227). पराभूत- अमोल राजू मोरे (91), गिननदेव मोहन चव्हाण (98) अलकाबाई कैलास नागोडे (98).