नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 127 गावांच्या असलेल्या एकूण 114 ग्रामपंचायतींपैकी 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होत आहेत.

सोनई, चांदा, भेंडा बुद्रुक या सर्वात मोठ्या (प्रत्येकी 17 सदस्य) ग्रामपंचायतींचा यात समावेश असल्याने तालुक्यातील 60 टक्केहून अधिक म्हणजे जवळपास दोन लाख लोकसंख्येच्या क्षेत्रात (1 लाख 40 हजार मतदार) निवडणुका होत असून त्यामुळे गावोगाव वातावरण निवडणूकमय झाले आहे.

नेवासा तालुक्यात 127 गावे असून त्यात 114 ग्रामपंचायती व एक नगरपंचायत आहे. या 114 ग्रामपंचायतींपैकी 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यकाल 2020 मध्ये संपला. मात्र करोनामुळे कार्यक्रम स्थगित झाला होता. आता निवडणुकीला 15 जानेवारीचा मुहूर्त लाभला असून गावोगाव गावपुढार्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे.

यावर्षी निवडणुका होणार्या गावांमध्ये सोनई, चांदा, भेंडा बुद्रुक, खरवंडी, कुकाणा, सलाबतपूर, बेलपिंपळगाव, घोगरगाव, शिंगणापूर, प्रवरासंगम या प्रमुख गावांचा समावेश आहे.

सोनई, चांदा, भेंडा बुद्रुक ही 17 सदस्यांच्या ग्रामपंचायींची मोठी गावे आहेत. त्या खालोखाल मोठ्या गावांमध्ये 15 सदस्यांच्या खरवंडीचा व त्यानंतर 13 सदस्यांच्या कुकाणा, सलाबतपूर, बेलपिंपळगाव या गावांचा समावेश आहे.

निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस जवळ येऊ लागला तसतसा गावपुढार्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. सरपंचपदाचेही आरक्षण पुढे ढकलेले गेले असल्याने आता ग्रामपंचायतीच्या सर्व प्रवर्गांच्या जागांवर पुढार्यांना सारखाच जोर लावावा लागणार आहे.

त्यामुळे प्रत्येक जागेवर उमेदवार देताना काळजी घेतली जात आहे. पॅनल बनवण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गावोगावच्या छोट्या कार्यकर्त्यांनीही निवडणूक जवळ आल्याने मतदारांशी जवळीक वाढवली आहे.

15 जानेवारी रोजी निवडणूक होणारी 59 गावे

गाव

1 सोनई

2 चांदा

3 भेंडा बुद्रुक

4 खरवंडी

5 कुकाणा

6 सलाबतपूर

7 घोगरगाव

8 प्रवरासंगम

9 बेलपिंपळगाव

10 बाभुळखेडा

11 बर्हाणपूर

12 बेल्हेकरवाडी

13 बकुपिंपळगाव

14 भालगाव

15 दिघी

16 देवगाव

17 देवसडे

18 गळनिंब

19 गेवराई

20 गोणेगाव

21 गोंडेगाव

22 जेऊर हैबती

23 जळके खुर्द

24 जळके बुद्रुक

25 कारेगाव

26 खेडलेपरमानंद

27 खडका

28 बहिरवाडी

29 लोहगाव

30 लांडेवाडी

31 म्हाळसपिंपळगाव

32 मक्तापूर

33 मंगळापूर

34 मुरमे

35 मोरेचिंचोरे

36 मांडेगव्हाण

37 निपाणीनिमगाव

38 नविन चांदगाव

39 पाचुंदा

40 पिंप्रीशहाली

41 पुनतगाव

42 रांजणगाव

43 रामडोह

44 सुरेगाव

45 शिंगणापूर

46 शिंगवेतुकाई

47 सुलतानपूर

48 टोका

49 तेलकुडगाव

50 तरवडी

51 उस्थळ दुमाला

52 उस्थळ खालसा

53 वाटापूर

54 वरखेड

55 वांजोळी

56 वाकडी

57 निंभारी

58 नजिकचिंचोली

59 नारायणवाडी