नेवास | Newasa

तालुक्यातील 72 गावांच्या 59 ग्रामपंचायतींच्या 591 जागांसाठी 15 जानेवारीला होणार्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या कालच्या

तिसर्या दिवशी 34 गावांच्या 28 ग्रामपंचायतींसाठी 186 अर्ज दाखल झाले. तिसर्या दिवसअखेर एकूण 204 अर्ज दाखल झाले आहेत. 38 गावांच्या 31 ग्रामपंचायतींसाठी कालअखेर एकही अर्ज दाखल झाला नाही.

काल बाभुळखेडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तीनही प्रभागातून प्रत्येकी चार असे एकूण 12 अर्ज दाखल झाले. बकुपिंपळगाव ग्रामपंचायतीच्या तीनही प्रभागात्तून प्रत्येकी दोन असे सहा अर्ज दाखल झाले. बेलपिंपळगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 मधून एक, प्रभाग 3 मधून एक असे एकूण दोन अर्ज दाखल झाले.

भेंडे बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी प्रभाग 1 मधून दोन, प्रभाग 2 मधून दोन, प्रभाग 3 मधून चार, प्रभाग 4 मधून 5, प्रभाग 5 मधून एक तर प्रभाग 6 मधून तीन अर्ज असे काल सोमवारी एकूण 17 अर्ज दाखल झाले. या ग्रामपंचायतीसाठी तिसर्या दिवसअखेर एकूण 20 अर्ज दाखल झालेले आहेत.

चांदा ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 मधून एक, प्रभाग 3 मधून तीन, प्रभाग 4 मधून दोन, प्रभाग 5 मधून तीन असे एकूण 9 अर्ज दाखल झाले. देवगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग 2 मधून एक अर्ज दाखल झाला. देवसडेच्या प्रभाग 1 साठी दोन, प्रभाग 2 साठी तीन तर प्रभाग 3 साठी एक असे एकूण सहा अर्ज दाखल झाले आहेत.

धनगरवाडी-नारायणवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रभाग 2 मधून तीन अर्ज दाखल झाले. गोंडेगाव-म्हसले ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 साठी एक, प्रभाग 2 साठी एक तर प्रभाग 3 साठी दोन असे एकूण 4 अर्ज दाखल झाले. गोणेगाव-इमामपूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 मधून एक प्रभाग 2 मधून तीन, प्रभाग 3 मधून दोन असे एकूण 6 अर्ज दाखल झाले आहेत.

जळके बुद्रुक ग्रमपंचायतीच्या प्रभाग 1 मधून चार, प्रभाग 2 मधून तीन, प्रभाग 3 मधून चार असे एकूण 11 अर्ज काल दाखल झाले. काल अखेरपर्यंत एकूण 14 अर्ज दाखल झालेले आहेत. जळके खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 साठी तीन तर प्रभाग 4 साठी एक असे एकूण 4 अर्ज दाखल झाले. जेऊर ग्रामपंचायतीच्या ग्रभाग 1 मधून 3, प्रभाग 2 मधून दोन, प्रभाग 3 मधून पाच, प्रभाग 4 मधून सहा तर प्रभाग 5 मधून तीन असे काल तिसर्या दिवशी 18 अर्ज दाखल झाले. तिसर्या दिवसअखेर 20 अर्ज दाखल आहेत.

खडके ग्रामपंचायतीच्या प्रभाग 2 साठी काल दोन अर्ज दाखल झाले. मुरमे-मडकी-खलालपिंप्री ग्रुप ग्रामपंचायतीसाठी प्रभाग 1 मधून तीन, प्रभाग 3 मधून एक असे काल 4 अर्ज दाखल झाले. तर तिसर्या दिवसअखेर 9 अर्ज दाखल झालेले आहेत.

खरवंडीच्या प्रभाग 3 साठी एक अर्ज दाखल झाला. खेडलेपरमानंदच्या प्रभाग 3 साठी एक अर्ज दाखल झाला. कुकाणा ग्रामपंचायतीच्या प्रभाग 2 साठी तीन, प्रभाग 3 साठी तीन असे एकूण 6 अर्ज दाखल झाले.

मक्तापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 मधून चार तर प्रभाग 2 मधून एक असे एकूण 5 अर्ज दाखल आहेत. माळेवाडी खालसा-म्हाळापूर-प्रवरासंगम ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 साठी दोन, प्रभाग 2 साठी सहा, प्रभाग 3 साठी पाच, प्रभाग 4 साठी चार, प्रभाग 5 साठी चार असे काल सोमवारी 21 अर्ज दाखल झाले. तर तिसर्या दिवसअखेर एकूण 22 अर्ज दाखल आहेत.

म्हाळसपिंपळगाव ग्रामपंचायतीसाठी प्रभाग 3 मधून एक अर्ज दाखल झाला. सलाबतपूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 साठी दोन, प्रभाग 2 साठी चार, प्रभाग 3 साठी एक, प्रभाग 4 साठी एक असे काल 8 अर्ज दाखल झाले. तर तिसरा दिवसअखेर एकूण 9 अर्ज दाखल आहेत.

शिंगवेतुकाई गामपंचायतीच्या प्रभाग 1 प्रभाग 2 व प्रभाग 3 मधून प्रत्येकी चार असे एकूण 12 अर्ज दाखल झाले आहेत.

सोनई ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1, प्रभाग 2 व प्रभाग 3 मधून प्रत्येकी एक तर प्रभाग 4 मधून दोन असे काल 5 अर्ज दाखल झाले. तिसर्या दिवसअखेर एकूण 6 अर्ज दाखल आहेत.

तरवडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग 2 मधून एक, प्रभाग 4 मधून एक असे एकूण दोन अर्ज दाखल आहेत.

टोका-वाशिम ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रभाग 2 मधून दोन, प्रभाग 3 मधून तीन असे एकूण 5 अर्ज दाखल आहेत. वाकडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 मधून पाच, प्रभाग 2 मधून तीन, प्रभाग 3 मधून चार असे एकूण 12 अर्ज दाखल झाले आहेत. वाटापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग 2 मधून दोन, प्रभाग तीन मधून एक असे काल तीन अर्ज दाखल झाले. तर कालअखेर एकूण 4 अर्ज दाखल झाले आहेत.

72 गावांच्या 59 ग्रामपंचायतींच्या 591 जागांसाठी काल तिसर्या दिवशी 186 अर्ज दाखल झाले. पहिल्या दिवशी दाखल झालेला एक अर्ज, दुसर्या दिवशीचे 17 अर्ज तर तिसर्या दिवशीचे 186 अर्ज असे तिसर्या दिवसअखेर एकूण 34 गावांच्या 28 ग्रामपंचायतींसाठी 204 अर्ज दाखल झाले आहेत. उर्ववरीत 31 गावांच्या 38 ग्रामपंचायतींसाठी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. अर्ज भरण्याचे शेवटचे दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या दिवसात अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी उसळणार आहे.

तिसर्या दिवसअखेर एकही अर्ज दाखल न झालेल्या 38 गावांच्या 31 ग्रामपंचायती

बहिरवाडी-धामोरी ग्रुप ग्रामपंचायत, बाभुळवेढे उस्थळदुमाला ग्रुप ग्रामपंचायत, बोरगाव-सुरेगाव गंगा ग्रुप ग्रामपंचायत, पिंप्रीशहाली-गोयगव्हाण ग्रुप ग्रामपंचायत, माळेवाडी दुमाला-सुरेगावतर्फे दहिगाव-वरखेड ग्रुप ग्रामपंचायत, मांडेगाव्हाण-मोरगव्हाण ग्रुप ग्रामपंचायत, बर्हाणपूर, बेल्हेकरवाडी, भालगाव, दिघी, गळनिंब, गेवराई, घोगरगाव, कारेगाव, लांडेवाडी, लोहगाव, मंगळापूर, मोरयाचिंचोरे, नजिकचिंचोली, नवीन चांदगाव, निंभारी, निपानीनिमगाव, पाचुंदे, पुनतगाव, रामडोह, रांजणगाव, शिंगणापूर, सुलतानपूर, तेलकुडगाव, उस्थळखालसा, वांजोळी.