नेवासा तालुक्यात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

नेवासा तालुक्यात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

जानेवारी ते डिसेंबर 2023 दरम्यान मुदत संपणार्‍या तालुक्यातील सोळा ग्रामंपचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 37 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

तालुक्यातील असलेल्या देडगाव व भानसहिवरे येथे 15 सदस्यपदांसाठी, पाचेगाव व मुकिंदपूर येथे 13 सदस्यपदांसाठी, रस्तापूर व करजगाव येथे 11 सदस्यपदांसाठी, पानेगाव, सौंदाळा, पानसवाडी, कौठा, जैनपूर या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी 9 सदस्यपदांसाठी तर फत्तेपूर, खुणेगाव, नागापूर, पिचडगाव, शहापूर येथे प्रत्येकी सात सदस्यपदांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

करजगाव, जैनपूर, पानसवाडी व पानेगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी, रस्तापूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी, मुकिंदपूर, कौठा, पाचेगाव, सौंदाळा ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे तर नागापूर, फत्तेपूर, खुणेगाव, भानसहिवरे, पिचडगाव, शहापूर, देडगाव ह्या ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आहे.

खामगाव, माळीचिंचोरा, महालक्ष्मी हिवरे, झापवाडी व गोधेगाव या पाच ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

16 ते 20 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मुदत असून 23 ऑक्टोबर रोजी छाननी होणार आहे. 25 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 5 नोव्हेंबर मतदान तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

एकूण गावे व मतदारांची संख्या- भानसहिवरा 5762, पाचेगाव 4856, देडगाव 4643, मुकिंदपूर 4114 करजगाव 2911, रस्तापूर 2162, कौठा 2039, पानेगाव 1909, सौंदाळा 1631, पानसवाडी 1395, शहापूर 1344, जैनपूर 1137, पिचडगाव 957, फत्तेपूर 848, खुणेगाव 753, नागापूर 614. एकूण स्त्री मतदार संख्या 18104 व पुरुष 18971 असे एकूण 37 हजार 75 मतदार आहेत.

याबरोबरच खामगाव, माळीचिंचोरा, गोधेगाव, महालक्ष्मीहिवरे व झापवाडी या पाच ग्रामपंचायतींची पोटनिवडणूकही जाहीर झाली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com