नेवासा : तीन प्रभागांतून प्रत्येकी 3 तर दोन प्रभागांतून जाणार प्रत्येकी 2 सदस्य

ग्रामपंचायत निवडणूक
नेवासा : तीन प्रभागांतून प्रत्येकी 3 तर दोन प्रभागांतून जाणार प्रत्येकी 2 सदस्य

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 18 डिसेंबर रोजी निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींपैकी सर्वात मोठ्या असलेल्या माळीचिंचोरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 5 प्रभागातून 13 सदस्य निवडून जाणार आहेत. त्याशिवाय अनुसूचित जाती प्रवर्गातील सरपंचपदाच्या उमेदवारालाही मतदान करावे लागणार आहे.

5175 लोकसंख्येच्या या गावात 1606 लोकसंख्या अनुसूचित जाती तर 479 अनुसूचित जमातीची आहे. प्रभाग क्र. 1, 2 व 5 मधून प्रत्येकी तीन व प्रभाग क्र. 3 व 4 मधून प्रत्येकी दोन सदस्य निवडून जाणार आहेत.

प्रभाग क्र. 1- या प्रभागाची लोकसंख्या 1197 इतकी असून त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 580 तर अनुसूचित जमातीची 264 इतकी आहे. या प्रभागातून अनुसूचित जाती, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे तीन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. पूर्व दिशेला प्रभाग क्र. 5 ची नकाशा शिव, पश्चिम दिशेला गावठाण ते चांदा रस्ता, दक्षिण दिशेला कारेगाव रस्ता तर उत्तर दिशेला गावठाण ते भानसहिवरे रस्ता अशी या प्रभागाची व्याप्ती आहे.

प्रभाग क्र. 2 - प्रभाग क्र. 2 ची लोकसंख्या 1190 इतकी असून त्यातील 210 अनुसूचित जाती व 60 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. या प्रभागातील मतदारांना अनुसूचित जाती, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे तीन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. पूर्वेकडे गावठाण ते चांदा रस्ता, पश्चिमेकडून नगर-औरंगाबाद मार्ग, दक्षिण दिशेने वडाळा शिव तर उत्तरेकडे माळीचिंचोरे गावठाण मार्ग असा हा प्रभाग व्यापलेला आहे.

प्रभाग क्र. 3 - या प्रभागाची लोकसंख्या 798 इतकी असून यातील 69 लोक अनुसूचित जाती व 14 अनुसूचित जमातीतील आहेत. या प्रभागातील मतदार अनुसूचित जाती स्त्री व सर्वसाधारण स्त्री असे दोन सदस्य निवडून देणार आहेत. पूर्वेकडून गावठाण ते भानसहिवरे रस्ता, पश्चिमेकडून नगर-औरंगाबाद मार्ग, दक्षिणेकडून माळीचिंचोरे गावठाण मार्ग व उत्तरेकडून बाभुळवेढा शिव अशी या प्रभागाची व्याप्ती आहे.

प्रभाग क्र. 4 - या प्रभागाची लोकसंख्या 791 इतकी असून त्यातील 148 अनुसूचित जाती तर 43 अनुसूचित जमातीचे आहेत. या प्रभागातून सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे दोन उमेदवार निवडून जाणार आहेत. पूर्वेकडून रांजणगाव शिव, पश्चिमेकडून गावठाण ते भानसहिवरा रस्ता, दक्षिणेकडून गावठाण ते जुना रांजणगाव रस्ता व उत्तरेकडून भानसहिवरा शिव अशी या प्रभागाची व्याप्ती आहे.

प्रभग क्र. 5 - या प्रभागाची लोकसंख्या 1199 इतकी असून त्यातील 599 लोकसंख्या अनुसूचित जातीची तर 98 अनुसूचित जमातीची आहे. या प्रभागातून अनुसूचित जाती स्त्री, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण स्त्री असे तीन उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. पुर्वेकडून कारेगाव शिव, पश्चिमेकडून प्रभाग 1 ची शिव, दक्षिणेकडून कारेगाव रस्ता तर उत्तरेकडून गावठाण ते जुना रांजणगाव रस्ता अशी या प्रभागाची व्याप्ती आहे.

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीच्या 18 डिसेंबरला होत असलेल्या निवडणुकीत 5 प्रभागातून 13 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. त्याशिवाय सर्वसाधारणसाठी खुल्या असलेल्या सरपंचपदाच्या एका उमेदवाराला मतदान करावे लागणार आहे.

या गावची एकूण लोकसंख्या 4831 इतकी आहे. अनुसूचित जाती लोकसंख्या 924 तर अनुसूचित जमाती लोकसंख्या 421 इतकी आहे. प्रभाग क्रमांक 1, 2 व 5 मधून प्रत्येकी तीन सदस्य तर प्रभाग 3 व 4 मधून प्रत्येकी दोन सदस्य असे एकूण 13 सदस्य निवडून दिले जाणार आहेत.

प्रभाग 1 - या प्रभागाची लोकसंख्या 1110 इतकी असून त्यातील 45 अनुसूचित जाती तर 12 अनुसूचित जमातीतील आहे. या प्रभागातून दोन सर्वसाधारण महिला व एक सर्वसाधारण असे तीन उमेदवार निवडून जाणार आहेत. पुर्वेकडून सांगवी रस्ता, पश्चिमेकडून नगर-औरंगाबाद मार्ग, दक्षिणेकडून खरवंडी व सांगवी शिव तर उत्तरेकडून हनुमान मंदीर ते नगर-औरंगाबाद मार्ग अशी या प्रभागाची व्याप्ती आहे.

प्रभाग क्र. 2 - या प्रभागाची लोकसंख्या 1115 इतकी असून त्यातील 52 अनुसूचित जाती व 16 अनुसूचित जमातीचे आहेत.या प्रभागातून अनुसूचित जाती, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे तीन उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. पुर्वेकडून नगर-औरंगाबाद मार्ग, पश्चिमेकडून खरवंडी शिव, दक्षिणेकडून खरवंडी शिव (सांगवी मळा) तर उत्तरेकडून प्रशांत चोरडिया यांचे दुकान ते खरवंडी शिवपर्यंत अशी असा हा प्रभाग व्यापलेला आहे.

प्रभाग 3 - या प्रभागाची लोकसंख्या 746 इतकी आहे. त्यातील 118 अनुसूचित जामती तर 32 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. या प्रभागातून अनुसूचित जाती स्त्री व सर्वसाधारण स्त्री असे दोन उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. पुर्वेकडून रवी मोटे यांचे घर ते गावठाण अंतर्गत रस्ता (इमापैलवान कॉलनीपर्यंत), पश्चिमेकडून नगर-औरंगाबाद मार्ग व पटेल दुकानापर्यंत, दक्षिण बाजूने हनुमान मंदीर व गावठाण अंतर्गत रस्ता हायवेपर्यंत, उत्तरेकडून पटेल दुकान ते इमा पैलवान कॉलनी चव्हाण यांचे घरापर्यंत अशी या प्रभागाची व्याप्ती आहे.

प्रभाग क्र. 4 - या प्रभागाची लोकसंख्या 743 इतकी आहे. यातील 370 अनुसूचित जाती व 180 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे दोनच उमेदवार या प्रभागातील मतदारांना निवडून द्यावयाचे आहेत.

प्रभाग क्र. 5 - या प्रभागाची लोकसंख्या 1117 इतकी आहे. त्यातील 339 अनुसूचित जाती व 181 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. अनुसूचित जमाती, सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री असे तीन उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. हा प्रभाग पुर्वेकडून माळीचिंचोरे व म्हाळसपिंपळगाव शिव, पश्चिमेकडून सांगवी रस्ता, दक्षिणेकडून सांगवी रस्ता व म्हाळसपिंपळगाव शिव तर उत्तरेकडून गावतलावाच्या आतील भाग इथपर्यंत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com