नेवासा |प्रतिनिधी|Newasa

तालुक्यातील 71 गावांच्या 59 ग्रामपंचायतींच्या 209 प्रभागांतून निवडून द्यावयाच्या 591 ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीसाठी

अर्ज भरण्याच्या कालच्या दुसर्या दिवशी 8 ग्रामपंच्यातींकरिता 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून दुसर्या दिवसअखेर एकूण 18 अर्ज दाखल झाले आहेत.

नेवासा तालुक्यातील मुरमे-खलालपिंप्री-मडकी ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काल सर्वाधिक एकूण 5 अर्ज दाखल झाले.त्यातील प्रभाग 2 मधून एक तर प्रभाग 3 मधून चार अर्ज दाखल झाले आहेत.

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 2 मधून एक तर प्रभाग 3 मधून दोन असे एकूण तीन अर्ज दाखल झाले. प्रवरासंगम-माळेवाडी खालसा-म्हाळापूर ग्रुप ग्रामपंच्यातीच्या प्रभाग क्र. 2 मधून काल एक अर्ज दाखल झाला.

सोनईच्या प्रभाग क्र. 6 मधून एक अर्ज दाखल झाला. सलाबतपूर ग्रामपंचायतीसाठी एक अर्ज दाखल झाला. हा अर्ज प्रभाग तीन मधून आहे. जळके बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी काल तीन अर्ज दाखल झाले.

त्यातील प्रभाग दोन मधून दोन तर प्रभाग 3 मधून एक अर्ज दाखल झाला. जेऊर ग्रामपंचायतीसाठी दोन अर्ज दाखल झाले. त्यातील एक अर्ज प्रभाग 1 मधून तर दुसरा अर्ज प्रभाग 3 साठी दाखल झाला. म्हाळसपिंपळगाव ग्रामपंचायतीसाठी एक अर्ज दाखल झाला. तो प्रभाग तीन मधून आहे.

बुधवारी वाटापूर ग्रामपंचायतीसाठी एक अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे दुसर्या दिवसअखेर नेवासा तालुक्यातील इच्छुकांच्या दाखल झालेल्या अर्जांची संख्या 18 झाली आहे.