शासनाने आता मंदिरे खुली करण्यास परवानगी द्यावी

शासनाने आता मंदिरे खुली करण्यास परवानगी द्यावी

नेवासा तालुक्यातील महाराज मंडळींनी व्यक्त केली अपेक्षा

नेवासाफाटा |प्रतिनिधी| Newasa

श्रावण महिन्याच्या सांगताप्रसंगी तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथील श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्राच्या रामकृष्ण आश्रमामध्ये संत पूजन सोहळा नुकताच पार पडला. आध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून धर्मजनजागृती करून समाजामध्ये धर्माचे वैभव वाढविण्यासाठी काम करण्याचा निर्धार करत शासनाने आता मंदिरे खुली करण्यास परवानगी द्यावी अशी अपेक्षा याप्रसंगी हितगुज साधताना महाराज मंडळींनी व्यक्त केली.

ब्रम्हलिन रामकृष्ण महाराज काळे यांनी स्थापन केलेल्या व भगवान महाराज जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्राच्या रामकृष्ण आश्रमामध्ये सामाजिक अंतराचे पालन करत बदाम महाराज पठाडे यांच्यावतीने हा सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी शिवाजी महाराज देशमुख होते. गोपालानंदगिरी महाराज, बाळकृष्ण महाराज दिघे, नंदकिशोर महाराज खरात, चांगदेव महाराज काळे, संजय महाराज सरोदे, ऋषिकेश महाराज वाकचौरे, कृष्णा महाराज मते, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे उपस्थित होते.

शिवाजी महाराज देशमुख म्हणाले की मंदिरे बंद असल्याने भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून ऑनलाईन प्रवचन व कीर्तन करत वारकरी संप्रदायातील संतांनी प्रबोधन केले.आता भक्तांच्या श्रद्धेचा विचार करून मंदिरे खुली करण्यासाठी शासनाने भूमिका घेणे गरजेचे आहे.

कार्यक्रमप्रसंगी मारुती महाराज जाधव, राजाराम महाराज तुवर, परशुराम महाराज घावटे, रामदास महाराज शास्त्री, गाडेकर महाराज, रणमले महाराज, योगेश महाराज पवार, राजेंद्र महाराज आसने, चांगदेव महाराज कर्डिले, राम महाराज खरवंडीकर, गणेश महाराज दरंदले, नारायण महाराज शास्त्री, केशव महाराज शिंदे, गोरक्षनाथ महाराज शास्त्री, श्रीहरि महाराज वाकचौरे, भाऊसाहेब महाराज मोरे, त्र्यंबक भाऊ दिघे, विष्णू ठोसर, अशोक महाराज बर्डे, अशोकराव काळे, भाऊसाहेब येवले यांच्यासह रामकृष्ण आश्रमातील सेवेकरी बाल वारकरी उपस्थित होते. सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर भगवान महाराज जंगले शास्त्री यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com