नेवासा तालुक्यात गावठी कट्टे बाळगणाऱ्या तिघांसह तलवार बाळगणाऱ्या एकास अटक

नेवासा तालुक्यात गावठी कट्टे बाळगणाऱ्या तिघांसह तलवार बाळगणाऱ्या एकास अटक

नेवासा |प्रतिनिधी|Newasa

नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) उपविभागीय पोलिस अधिकारी (Sub divisional Police Officer), नेवासा पोलीस ठाणे (Newasa Police Station) व स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) यांच्यावतीने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत तालुक्यातील 29 ठिकाणी छापे (raid) टाकून एक तलवार व तीन गावठी कट्टे जप्त (Gavathi Katta) करण्यात येऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

लक्ष्मण सहादु आढागळे (रा.गंगानगर नेवासा) याच्या राहते घरी तलवार मिळून आली. रितेश पुनमचंद साळवे (रा.मक्तापूर) यांचेकडे गावठी कट्टा मिळून आला. शुभम विश्वास गर्जे (रा. वडुले) व आकाश उर्फ देवा जालिंदर लष्करे (रा. नेवासा फाटा) यांचे राहते घरी गावठी कट्टा मिळून आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com