गणेशोत्सव व मोहरम करोना व गुन्हामुक्त साजरा करा - दीपाली काळे

गणेशोत्सव व मोहरम करोना व गुन्हामुक्त साजरा करा - दीपाली काळे

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

गणेशोत्सव व मोहरम करोनामुक्त व गुन्हामुक्त करावा. साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ उत्सव साजरा करा, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनी केले.

नेवासा येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची गुरुवारी शांतता बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, शिंगणापूरचे पोलीस निरीक्षक वसंत भोये, सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, तहसिल कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उत्तमराव रासकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक रवींद्र गुप्ता उपस्थित होते.

अप्पर पोलीस अधीक्षक काळे म्हणाल्या की गणेशोत्सव व मोहरम सणात करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या काळजी बरोबर प्रसार रोखण्याचे काम आपल्याला करायचे आहे.नदीकिनारी श्रीगणेशाचे विसर्जन यावेळी होणार नसून नगरपंचायतीकडे विसर्जनाची जबाबदारी यावेळी असणार आहे.

तालुक्यात शक्यतो ‘एक गाव एक गणपती’ उत्सव साजरा करा. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन सर्वांनी करायचे आहे. नियमांचे पालन न झाल्यास मंडळावर गुन्हे दाखल करावे लागतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना गणेशोत्सव मंडळ सदस्यांना समजावून सांगितल्या.

यावेळी सतीश पिंपळे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे,निरंजन डहाळे,शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन जगताप, जालिंदर गवळी, अजित नरूला, महेश देवढे यांच्यासह शहर व तालुक्यातील विविध मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com