नेवासा तालुक्यात यंदा गणेशोत्सवाच्या तयारीला करोना सावट
सार्वमत

नेवासा तालुक्यात यंदा गणेशोत्सवाच्या तयारीला करोना सावट

Arvind Arkhade

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

यंदा गणेशोत्सव करोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा होणार असल्याने. शहरामध्ये गणेश मंडळाची गणेश उत्सवाची तयारीची लगबग दिसत नाही. त्यामध्ये वर्गणी, मंडप उभारणी सजावट, लेझीम डाव, ढोल पथक सराव आदी तयारी दिसत नाही.

तर दुसरीकडे विघ्नहर्त्या गणेशाचं आगमन चार दिवसांनवर येऊन ठेपलंय. त्यामुळे सगळीकडेच मूर्ती तयार करण्याच्या कामानं वेग घेतलाय. माती पासुन बनवलेल्या श्री गणेश मुर्तीना रंग देण्याचे काम सुरु आहे. इकोफ्रेंडली गणेशोत्सवाकडे लोकांचा कल वाढत असल्यामुळे मातीच्या मूर्तींची मागणी वाढतेय.

निसर्ग आणि गणेशोत्सव हे वेगळेच नाते आहे. ज्या निसर्गातून बाप्पांची मूर्ती घडविण्यासाठी आपण माती घेतो, ती माती निसर्गालाच समर्पित केली पाहिजे. यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे साठी मातीचा गणपतीची स्थापना करण्यासाठी मातीच्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत असल्याने मातीच्या मूर्ती घेण्याकडे भाविक वळत आहे.

त्यामुळे तालुक्यातील खुपटी येथील बाबासाहेब ज्ञानदेव शिर्के, रवींद्र ज्ञानदेव शिर्के व घरातील सर्व व्यक्ती हा पारंपारिक गणपती बनवण्याचा व्यवसाय करतात जास्तीत जास्त मातीपासून बनवलेल्या गणपती मुर्ती मोठ्या प्रमाणात विकतात.

यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तरीही मातीपासून बनवलेले गणपती मुर्ती जे पाण्यामध्ये विसर्जनाच्या वेळेस सहज विरघळून जातील. व्यावसायिक खूप अडचणीत आहेत तरीही हा पारंपरिक व्यवसाय चालू ठेवणे महत्वाचे आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com