नेवासा फाटा गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक

शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
नेवासा फाटा गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक

नेवासा l का. प्रतिनिधी

नेवासा ते नेवासा फाटा दरम्यान सेंट मेरी स्कूल रोड समोर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या गोळीबार व मारहाण प्रकरणातील तिघा आरोपींना नेवासा पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

नेवासा फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी दोघांवर बियरच्या बाटलीने मारहाण करून गावठी कट्ट्यातून तीन फ़ैरी झाडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता.

याबाबत आकाश कुसळकर याने दाखल फिर्यादीवरून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक विजय करे यांनी याप्रकरणी स्वतः तपास करून आरोपी अनिल चव्हाण, मयूर वाघ व ज्ञानेश्वर दहातोंडे या तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com