कडबाकुट्टी यंत्रात पदर अडकून झालेल्या अपघातात विवाहित महिलेचा मृत्यू

नेवासा तालुक्यातील हृदयद्रावक घटना...
कडबाकुट्टी यंत्रात पदर अडकून झालेल्या अपघातात विवाहित महिलेचा मृत्यू

नेवासा । तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील देवगाव (Devgoan) येथे जनावरांसाठी कडबाकुट्टी करत असताना महिलेच्या साडीचा पदर कडबाकुट्टी यत्राच्या बेल्टमध्ये अडकुन झालेल्या अपघातात सरिता अजिनाथ गवते (वय 25 वर्ष) या विवाहित महिलेच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवगाव येथील सरिता गवते ही विवाहित महिला व पती आजिनाथ दोघे सकाळी सात वाजेच्या सुमारास जनावरांसाठी कडबा कुट्टी करत असताना नजर चुकीने सरिताच्या साडीचा पदर कडबा कुट्टी यंत्राच्या बेल्टमध्ये अडकला.

त्यामुळे सरिता हीचे डोके मागील बाजूने कडबा कुट्टी यंत्रावर जोराने आदळल्याने डोक्याला मोठी जखम झाली. डोक्याला झालेल्या जखमेतून मोठा रक्तस्राव झाल्याने तिला उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात नेत असताना रुग्णालयाजवळ जाताच रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

सरिताच्या मृत्यने देवगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सरीताला तीन वर्षाचा मुलगा व अकरा महिन्याची लहान मुलगी आहे. देवगाव येथे शोकाकुल वातावरणात सरितावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com