चांदा दरोड्यातील तिघे आरोपी जेरबंद

चांदा दरोड्यातील तिघे आरोपी जेरबंद

एलसीबीची कारवाई

नेवासा | का.प्रतिनिधी

नेवासा (Newasa) तालुक्यातील चांदा येथे 29 ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या दरोड्याच्या घटनेतील तिघा आरोपींना अटक करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाला यश आले. तिघेही आरोपी नेवासा तालुक्यातील आहेत.

याबाबत माहिती अशी की 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री चांदा येथील आडभाई व गायकवाड वस्तीवर दरोडा पडला होता . सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या गुन्ह्यात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने डांगर उर्फ प्रवीण छगन भोसले (रा.मुकिंदपुर), सुदाम उर्फ शिवदास सुमन भोसले (रा. गेवराई ता. नेवासा) व पंकेश उर्फ पंक्या जगताप भोसले (रा. फत्तेपुर ता.नेवासा) यांना अटक करण्यात आली.

आरोपी डांगर उर्फ प्रवीण छगन भोसले याचे विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात 2019 मध्ये दोन तर शिर्डी व वाळूज पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला. आरोपी सुदाम उर्फ शिवदास सुमन भोसले यांचे विरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात 2008 मध्ये एक तर नेवासा पोलीस ठाण्यात 2021 मध्ये एक असे दोन गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com