ऊसतोड कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्याला पोलीसांकडुन अटक

ऊसतोड कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्याला पोलीसांकडुन अटक

नेवासा | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील बेल पिंपळगाव शिवरात ऊसतोडणीसाठी आलेल्या ऊसतोड कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरांना नेवासा पोलीसांनी श्रीरामपूर सायबर सेलच्या मदतीने अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.4 जानेवारी 2022 रोजी फिर्यादी आकाश सुपलु राठोड (रा.बेलपिंपळगाव, ता.नेवासा) यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती कि, बेलपिंपळगाव शिवरात ऊस तोडणीकरीता इतर परिवारासह आलेलो असुन दि.2 जानेवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्याने आमचे कोपीवरील राहणारे लोकांचे सुमारे 14 हजार रुपये किंमतीचे 3 मोबाईल चोरुन नेले आहेत. सदर बाबत नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोना बबन तमनर हे करत होते.

गुन्ह्यात चोरीस गेले मोबाईलचा अप्पर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर यांचेकडील सायबर टीमच्या मदतीने माहीती प्राप्त करुन पुराव्याच्या आधारे तपास करुन आरोपी नामे समिर भाउसाहेब भोसले (वय 20वर्षे) रा. मुकिंदपुर ता.नेवासा यास अटक करण्यात आली असुन त्याच्या कडून एक बिगर नंबरची पल्सर मोटार सायकल तसेच गुन्ह्यात चोरीस गेले 3 मोबाईल जप्त करण्यात आले असुन आरोपीकडुन आणखी अशाप्रकारचे गुन्ह उघड होण्याची दाट शक्यता आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार याचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोना बबन तमनर, पोना अशोक कुदळे, पोकॉ अंबादास गिते, पोकॉ केवल रजपुत, पोकॉ योगेश आव्हाड तसेच अपर पोलीस अधिक्षक सो श्रीरामपुर यांचे सायबर टीमचे पोना फुरकान शेख, प्रमोद जाधव यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com