
नेवासा(तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील गेवराई येथून नेवासा पोलीस पथकाने सराईत गुन्हेगारांकडून चोरीच्या सहा मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत.
याबाबद अधिक माहिती अशी की,दिनांक २१/०१/२०२३ रोजी रात्री २०:३० याचे समारास पोलीस स्टेशनला हजर असताना पानि विजय करे यांनी पोसई समाधान भाटेवाल, सफा बाळकृष्ण टोंबरे, पोना राहुल यादव, पोना संजय माने, पोकों गणेश इथापे,पोकाम गुनाळ, पोकों अंबादास गिते व होमगार्ड प्रविण वाल्हेकर असे सर्वांना कळविले की, नेवासा पोलीस स्टेशन गुरनं ५४/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे मधील फिर्यादी नाम किशोक बहिरुनाथ कोकणे वय २० वर्ष रा. नेवासा, ता.नेवासा जि. अहमदनगर यानी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशनला वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदर गुन्हाचा तपास करता त्यामध्ये गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा अनिल रावसाहेब बरा गेवराई ता नेवासा जि. अहमदगनर याने केले असल्याची माहिती पोनि विजय करे यांना मिळाली याचे आदेशावरून पोलीस पथक रवाना करण्यात आरने होते सदर पोलीस पथकाने गेवराई ता नेवासा येथे जावून सदर आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हा संदर्भाने चौकशी तपास करता त्याने सदर गुन्हयातील मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली गुन्हा करते वेळी त्याचे बरोबर साजिद परवेज ऊर्फ पप्पु पठाण रा खडका फाटा ता नेवासा हा असल्याचे नमुद आरोपीकडुन समजल्याने वरील आरोपींना ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपुस केली असता त्यांनी १४ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली असून आरोपीत यांचकडून
खालीप्रमाणे मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या.....
१) बजाज पलेटीना २) सोडा ऑक्टर ३) प्लेझर हिरो होन्डा ४) दी को एस स्टार (५) बजाज बॉक्सर ६) बजाज बॉक्सर
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीम. स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विजय करे, पोसई समाधान भाटेवाल, सफौ बाळकृष्ण ठोंबरे, पोना राहुल यादव, पाना संजय माने, पोकों गणेश इथापे, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ अंबादास गिते व होमगार्ड प्रविण वाल्लेकर यांनी केली असून पुढील तपास सफी बाळकृष्ण दोबरे हे करीत आहेत.